राष्ट्रवादी काँग्रेसचा कामठा येथे कार्यकर्ता मेळावा 

0
16
गोंदिया,दि.२३- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुका गोंदियाच्यावतीने आज मंगळवारला कामठा येथे कार्यकर्ता मेळावा तसेच सदस्य नोंदणी अभियानाचा शुभारंभ राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार प्रफुल पटेल यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.या कार्यक्रमाला माजी आमदार राजेंद्र जैन,माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विजय शिवणकर,म्हाडाचे माजी अध्यक्ष नरेश माहेश्वरी,जिल्हाध्यक्ष विनोद हरिणखेडे,राजलक्ष्मी तुरकर,किशोर तरोणे,गंगाधर परशुरामकर,बालकृष्ण पटले,कुंदन कटारे,प्रेम रहागंडाले,खुशबू टेंभरे,कैलास पटले,केतन तुरकर,सुरेश हर्षे,राजेश भक्तवर्ती,गणेश बरडे,डुलेश्वरी लिल्हारे,भोजराज चुलपार,अखिलेश सेठ,चुन्नीलाल बेंदरे,डॉ.विनोद पटले,अशोक गुप्ता,सुनिता दोनोडे,सपना अग्रवाल,रजनी गौतम,किर्ती पटले आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी खासदार पटेल यांनी पक्ष मजबूत करण्यासाठी सदस्यता नोंदणी मोहीम सक्रियतेने राबविण्याचे आवाहन करीत येत्या काळात घडणाèया राजकीय घडामोडीवर लक्ष केंद्रीत करुन सत्ताधारी सरकारच्या विरोधात आक्रमक भूमिका पक्षाच्या प्रत्येकाने पार पाडावी असे आवाहन केले.