सौन्दडचे ग्रामीण रुग्णालय भूमीपूजनाच्या प्रतिक्षेत

0
5

सडक अर्जुनी,दि.२४(बबलू मारवाडे)-तालुक्यातील सौन्दड येथे ग्रामीण रुग्णालय मंजूर झाले.त्याचे कामही प्राथमिक आरोग्य केंद्रात सुरु झाले आहे.परंतु ग्रामीण रुग्णलयासाठी प्रस्तावीत असलेल्या जागेवर रुग्णालय उभारणीसाठी मात्र भूमिपूजनाच्या मुहुर्त अद्यापही न निघाल्याने नेत्यांना वेळ कधी मिळणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मार्च २०१७ मध्ये राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियांनातर्गत ११.५२ कोटी रुपयाची निधी ग्रामीण रुग्णालयासाठी मंजूर झाला.परंतु स्थानिक लोकप्रतिनिधीनी निधी मंजूर झाल्यानंतरही भूमिपूजनाकडे दुर्लक्ष का केले यावर परिसरात उलट सुलट चर्चांना वेग आला आहे.
सौंदड हे राष्ट्रीय महामार्गावरील महत्वाचे गाव असल्याने याठिकाणी ग्रामीण रुग्णालय लवकरात लवकर अस्तित्वात येणे आरोग्य सेवेच्या दृष्टीने महत्वाचे आहे. इमारतीअभावी रुग्णावंर योग्य उपचार होत नाही.डॉक्टरांना प्रतिनियुक्तीवर पाठविले जाते.तर औषधसाठाही अपुरा राहत असल्याने रुग्णांना आपल्या खिश्यातूनच औषधी खरेदी करावी लागले.त्यामुळे पालकमंत्र्यांनी आपल्या मतदारसंघातील सौदंडच्या ग्रामीण रुग्णालयाचे भूमिपूजनासाठी पुढाकार घेऊन नागरिकांची प्रतिक्षा संपवावी अशी मागणी पुढे आली आहे.