शिबीरातून कल्याणकारी योजनांची माहिती जाणून घ्या – न्या. कमलाकर कोठेकर

0
12
नागरा येथे शासकीय योजना व विधी सेवा शिबीर
 
* विविध स्टॉलमधून योजनांची माहिती
* आरोग्य तपासणी व रक्तदान शिबीर
* लाभार्थ्यांना मंजूरीपत्राचे वाटप
गोंदिया,दि.28 : विविध प्रकारच्या कायदयाची माहिती विधी सेवा प्राधिकरणच्या माध्यमातून जनतेला देण्यात येते. सार्वजनिक हिताच्या व लोककल्याणासाठी शासनाच्या अनेक योजना आहेत. या शिबीरातून नागरिकांनी आपल्या कल्याणकारी योजनांची माहिती जाणून घ्यावी. असे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश कमलाकर कोठेकर यांनी केले.
गोंदिया तालुक्यातील नागरा येथे काल 27 जानेवारी रोजी आयोजित जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा वकील संघाच्या वतीने आयोजित शासकीय सेवा,  योजना व विधी सेवेच्या महाशिबीरात अध्यक्षस्थानावरुन न्या. कोठेकर बोलत होते. विशेष अतिथी म्हणून जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे होते.
 प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य  कार्यकारी अधिकारी डॉ. एम. राजा. दयानिधीपोलीस अधिक्षक डॉ. दिलीप पाटील-भूजबळ,  जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या सदस्य सचिव न्या. श्रीमती ईशरत शेखजिल्हा वकील संघाचे अध्यक्ष ॲड टि.बी. कटरेनागरा सरपंच पुष्पाताई अठराहे यांची उपस्थिती होती.
न्या. श्री कोठेकर म्हणालेनागरिकांनी योजनांचा लाभ घेण्याच्या दृष्टीने  अर्जासोबत कोणती कागदपत्रे लागतात याची माहिती स्टॉलवरुन करुन घ्यावी. योजनेचा लाभ मिळण्यासाठी  कागदपत्रांची पुर्तता केली तरच योजनेचा लाभ मिळू शकतो. शिबीराला आलेल्या नागरिकांनी इथे असलेल्या स्टॉल भेट दयावी. त्यामुळे माहिती मिळण्यास मदत होईल. विविध यंत्रणांनी शिबीरात स्टॉल लावून सहकार्य केल्याबद्दल त्यांचे आभार मानले.
श्री दयानिधी म्हणालेया शिबीराचा नागरा परिसरातील जास्तीत जास्त नागरिकंनी लाभ घ्यावा. जिल्हा परिषदेमार्फत लोककल्याणकारी व सार्वजनिक हिताच्या अनेक योजना राबविण्यात येतात.शिबीरात लावण्यात आलेल्या जिल्हा परिषदेच्या विविध यंत्राणांच्या स्टॉलला नागरिकांनी भेट देवून योजनांची माहिती जाणून घ्यावी. योजनेचा लाभ मिळवून घेण्याबाबात काही शंका असतील तर त्याचे समाधान स्टॉलवरुन करुन घ्यावे. लोकांची शिबीराच्या माध्यमातून सेवा करण्याची चांगली संधी उपलब्ध झाल्याचे त्यांनी सांगितले.
डॉ. भूजबळ म्हणाले शिबीराच्या माध्यमातून काही लाभार्थ्यांना जागेवरच लाभ देण्यात येत आहे. जबाबदार प्रशासनासोबतच सामाजिक उत्तरदायित्वाची आणि संवेदनशिलेची प्रचिती येथे येत आहे. पोलीस विभागाच्या स्टॉलमधून सायबर गुन्हेमहिलांसाठीच्या प्रतिसाद ॲप्सपोलिस मित्र ॲप्स बाबतची माहिती देण्यात येणार आहे. नवनविन तंत्रज्ञानाचा वापर करुन पोलीस प्रशासन गतीमान झाल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश कमलाकर कोठेकर व जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांच्या हस्ते प्रधानमंत्रीरोजगार निर्मिती कार्यक्रमाअंतर्गत नागरा येथील ज्ञानेश्वरी लिल्हारे यांना ॲक्वा वॉटर प्लॅन्टसाठी लक्ष रुपये व प्रतुल गणवीर यांना सायकल स्टोअर्स व्यवसाय सुरु करण्यासाठी दोन लक्ष रुपये कर्ज देना बँकेने मंजूर केले. या दोन्ही लाभार्थ्यांना बँकेचे कर्ज मंजूरीपत्र देण्यात आले. शिबीराला न्यायिक अधिकारी माधुरी आनंदपी.एस.खरवडेपी.बी.भोसलेश्रीमती ए.एस. जरुदेश्रीमती व्ही. आर. मालोदेएन.आर.ढोकेविक्रांत खंदारे यांची प्रामुख्याने उपस्थिती होते. विविध स्टॉलवर संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी नागरिकांना माहिती देण्यासाठी उपस्थित होते.