अनुकंपाधारकांना नगर परिषदेत स्थायी करा,खा.पटेलांना साकडे

0
5

गोंदिया,दि.02 : अनुकंपाधारकांना नगर परिषदेत स्थायी सेवेत सामावून घ्यावे अशी मागणी अनुकंपाधारकांनी खासदार प्रफुल्ल पटेल यांची भेट घेऊन त्यांच्याकडे केली. त्यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले.
नगर परिषदेत अनुकंपा तत्वावरील प्रतीक्षा यादीत ४४ उमेदवार आहेत. मागील १० वर्षांपासून नोकरी मिळावी यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. यातील काहींची आता वयोमर्यादा होत आहे. मात्र अद्याप त्यांना सेवेत सामावून घेण्यात आलेले नाही. आपल्या मागणीसाठी त्यांचे आंदोलन सुरू आहे. मात्र त्याचाही काहीच फायदा मिळाला नाही. अखेर या अनुकंपाधारकांनी खासदार पटेल यांची भेट घेऊन त्यांना नोकरीत सामावून घेण्यात यावे या मागणीचे निवेदन दिले. यावर खासदार पटेल यांनी या विषयात योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले. मनोहर वालदे, विनीत सहारे, विष्णू नागरीकर यांच्या मार्गदर्शनात अनुकंपाधारक अनूप कुर्वे, पंकज चव्हाण, निलेश चव्हाण, प्रकाश धोटे, किर्तीकुमार लांजेवार, सुशांत बंसोड, राजेश हलमारे, सागर कटरे, अशोक पटले, सुरेखा भेलावे, भावेश चौधरी, विक्की बांगडकर, किरण यादव यांच्यासह अन्य निवेदन देताना उपस्थित होते.