प्रविण भोंदे विदर्भ राज्य आंदोलन समिती युवा आघाडी भंडारा जिल्हाध्यक्ष

0
11

 भंडारा,दि.३: ओम साई मंगल कार्यालय भंडारा येथे पार पडलेल्या भंडारा जिल्हा विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या बैठकीत विदर्भ राज्य आंदोलन समितीचे मुख्य आयोजक राम नेवले यांनी भंडारा जिल्हा युवा आघाडी अध्यक्षपदी प्रविण भोंदे यांची निवड केली.त्यावेळी सौ.विजया धोटे, मुकेश मासुरकर,केंद्रीय कमेटी सदस्य तथा माजी आमदार अॅड. आनंदराव वंजारी,  माजी आमदार मधुकर कुकडे, जिल्हाध्यक्ष वासुदेवराव नेवारे, जिल्हा उपाध्यक्ष दामोधर क्षिरसागर, जिल्हा कोषाध्यक्ष अर्जून सुर्यवंशी, प्रभु तईकर, सदस्य गोविंदराव चरडे, जिल्हा सचिव के.एन नान्हे, जाधवराव साठवने, प्रेमलाल लांजेवार, प्रेमराज मोहकर,मोरेश्वर बोरकर, प्रभाकर सपाटे, सूर्यकांत ईलमे, भाऊ कातोरे, देवीदास लांजेवार, महिला जिल्हाध्यक्ष सौ. रेणूका धकाते, सौ. सरिता राठोड, प्रिया शहारे व अदि बहूसंख्य विदर्भवादी कार्यकर्ते उपस्थित होते.