डाॅ.आंबेडकर चौक परिसरात स्वच्छता अभियान

0
5

गोंदिया,दि.05ः-येथील सहयोग संघटना,यंग चॅलेंजर स्टडी गृपच्यावतीने दररविवारला भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे.गेल्या दोन तीन महिन्यापासून हे अभियान सतत सुरु असून दररविवारला सकाळी 7 ते 8.30 पर्यंत स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे.या रविवारला या अभियाना भंडारा-गोंदिया जिल्हा लोकसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष प्रफुल अग्रवाल यांनी सहभाग नोंदवित स्वच्छता अभियानात भाग घेतला.यावेळी संकेश तिवारी,देवा रुसे,भागवत मेश्राम,दिपल अग्रवाल,नागदेवे आदी यंग चॅलेंजर स्टडी गृपचे सदस्य व सहयोग संघटनेचे सदस्य सहभागी झाले होते.