तालुकास्तरावर प्रशिक्षण केंद्र सुरू करा

0
8

भंडारा,दि.0८ :जिल्ह्यात बेरोजगारांची संख्या वाढत असून शेतकर्‍यांच्या मुलांना व युवक-युवतींना स्वयंरोजगारातून रोजगाराची संधी मिळावी, याकरिता तालुकास्तरवर प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात यावे, यासह इतर मागण्यांचे निवेदन भारतीय युवा बेरोजगार संघटनेच्या वतीने जिल्हाधिकार्‍यांनी देण्यात आले.
सनफ्लॅग, अशोक लेलॅंड, व्हिडीओकॉन, फेरेरो आदी कंपन्यांमध्ये नियमाबाह्य भरती केल्यामुळे सुशिक्षीत बेरोजगारांवर अन्याय झाला आहे. त्यामुळे कंपन्यांवर कारवाईकरण्यात यावी, सुशिक्षीत बेरोजगारांना लघू व गृहउद्योगाच्या माध्यमातून तालुकास्तरावर केंद्र निर्माण करावे, जिल्ह्यातील २७ कारखान्यांमध्ये नियमानुसार जिल्ह्यातील ६५ टक्के बेरोजगारांना संधी द्यावी, छत्तीसगड व कर्नाटक राज्याच्या धर्तीवर भंडारा जिल्ह्यातील दुग्ध उत्पादक शेतकर्‍यांना ५ रुपये प्रतिलिटर पशुखाद्याकरिता अनुदान द्यावे, १४ वर्षापासून प्रतिक्षेत असलेल्या ११६१ पदवीधर अंशकालीन उमेदवारांना नियुक्ती देण्यात यावी, आदी मागण्यांचे निवेदन यावेळी देण्यात आले. निवेदन देताना माजी खा. नाना पटोले, बालु चुóो, सिलमंजू सिव्हगडे, अविनाश ब्राम्हणकर, अजय तुमसरे, अजय गडकरी, बाळा शिवनकर, राकेश राऊत, सुभाष दिवठे, रजनीकांत खंडारे, सुधीर नंदेश्‍वर, गुणवंत दिघोरे, चंद्रशेखर रामटेके व कार्यकर्ते उपस्थित होते.