कुर्‍हाडी मार्गावर सकाळी बसफेरी सुरू करा

0
12

गोरेगाव दि.0८ :: तालुक्यातील मोठय़ा गावांमध्ये कुर्‍हाडी गावाचे स्थान असून कुर्‍हाडी येथील शेकडो विद्यार्थी गोरेगाव व गोंदिया येथील शाळा – महाविद्यालयात शिक्षण घेण्यासाठी जातात. मात्र सकाळच्या वेळेत एसटी बसची व्यवस्था नसल्यामुळे या विद्यार्थ्यांची चांगलीच कोडी होते. तेव्हा यावेळेत गोंदियाकडे जाणारी बस सेवा सकाळी सात वाजता सुरू करण्याची मागणी परिसरात विद्यार्थ्यांसह कुर्‍हाडी येथील सरपंचा अल्का पारधी यांनी केली आहे.