परवानगीच्या नावाखाली बंद पाडली स्वच्छता मोहीम

0
6

नवेगावबांध,दि.0८ :इटियाडोह संरक्षण व संवर्धन समितीची स्थापन करून मागील तीन महिन्यांपासून स्वच्छता मोहीम उघडली आहे. त्यातच संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांशी चर्चा करूनच युवक स्वच्छता मोहीम करीत असताना शाखा अभियंता डाखोरे यांनी परवानगीच्या नावाखाली मोहीम बंद पाडल्याने समितीच्या स्वप्नावर विरजण पाडणार्‍या अधिकार्‍यांच्या विरोधात रोष निर्माण होऊन या अधिकार्‍यावर कारवाई करण्यात यावी, या मागणीला धरून परिसरातील ग्रामस्थ रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
इटियाडोह पर्यटनस्थळाच्या विकासासाठी सरसावलेल्या युवकांनी शासनाच्या निधीचा उपयोग न करता मागील दोन महिन्यांपासून या परिसरातील हे तरुण स्वच्छतेसाठी र्शमदान करीत आहेत. या समितीने इटियाडोह धरणाच्या पायथ्याशी र्शमदानातून स्वच्छता अभियान राबविण्यासाठी बाघ इटियाडोहच्या वरिष्ठ अधिकार्‍यांना पत्रव्यवहार व रीतसर भेटून चर्चा केली.
घटनेच्या दिवशी, आपला चांगला अभिनव उपक्रम असल्याने आपणास स्वच्छतेबाबत सहकार्य करण्याची भावना त्यावेळी उपविभागीय अभियंता भिवगडे यांनी दूरध्वनीवरून दिली. तशीच महिती याबाबत शाखा अभियंता यांना पूर्व माहिती असताना स्वच्छता अभियान थांबविण्याचे कारण समजू शकले नाही.आजपर्यंत शासनाची लुबाडणूक करण्याचे काम सुरु असताना आता युवकच स्वच्छता अभियान राबवित असल्याने अधिकार्‍यांना मालसुतो अभियान संपुष्टात येत असल्याने अधिकार्‍यांची आगपाखड होऊन स्वच्छता मोहिमेला थांबवून उपक्रम मोडकळीस आणण्याचे काम करीत असल्याचा आरोप आता ग्रामस्थ करीत आहेत.