सालेकसा तालुक्याता पाण्याचे संर्वधन करा-मनसे

0
5
सालेकसा,दि.08ः  दुष्काळ ग्रस्त घोषित सालेकसा तालुक्यातील जलसाठा उन्हाळाच्या सुरुवातीलाच कमी झाल्याने तालुक्यातील तळे पाण्याअभावी कोरडे पडले आहेत.त्यातच काही शिल्लक असलेले जलसाठ्यातील पाण्याचा योग्य प्रकारे वापर व्हावा  याकरीता  जिल्हाधिकारी यांचे विशेष निर्देश सुद्धा आहेत.त्यामुळे उर्वरित जलसाठे आणि वन्यजीव सुरळीत राहावे  उद्देशाने सालेकसा तालुक्यात विशेष लक्ष देऊन वनतलाव बांधणीचे कामे करण्यात आले.पाण्याच्या संवर्धनासाठी शासनातर्फे अहोरात्र परिश्रम घेत आहे.शासकीय निधी खर्च केला जाते,मात्र सालेकसा येथील जलसंधारण विभाग जल संवर्धनाकडे दुर्लक्ष करीत असल्याने तालुक्यात पाण्याची समस्या निर्माण झाल्याचा आरोप  महाराष्ट्र नवनिर्माण सेना सालेकसा तालुका अध्यक्ष ब्रजभूषण बैस यांनी निवेदनाद्वारे केला आहे. यंदा पावसाचे प्रमाण कमी असल्याने सालेकसा तालुका दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत टाकण्यात आल्याने तहसीलदार सालेकसा यांनी रब्बी धानाची लागवड न करण्याचे आव्हान शेतकऱ्यांना केले होते. एकीकडे शेतकऱ्यांना पाण्याअभावी नुकसान झाले असून तालुक्यात जलसंधारण साठी असलेल्या विभागातर्फे पाण्याचे असे अपव्यय करणे येत्या उन्हाळ्यात वन्यजीवांसाठी मारक ठरणार आहे.यावर त्वरित कार्यवाही करून पाण्याची गळती थांबवण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे तहसिलदारांना  निवेदन  देऊन करण्यात आली.त्यावेळी राहुल हटवार, सुजित सांगोडे, योगेश पटले इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे स्वप्नील करवाडे, राहुल मेश्राम, भौतिक हरिनखेडे, रितीक हरिनखेडे, आकाश मंडलवार इत्यादी विद्यार्थी उपस्थित होते.