अस्वलीच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू तर २ गंभीर जखमी

0
13

चंद्रपुर,दि.08 :- चंद्रपूर जिल्ह्यातील तिरवंजा परिसरातील जंगलात अस्वलीने केलेल्या हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला असुन २ जण गंभीर जखमी असल्याची घटना काल घडली आहे. या हल्ल्यात मजुरांनी केलेल्या प्रतिहल्ल्यात अस्वलाचा देखील मृत्यू झाला आहे. मृतक आणि जखमी झालेले सर्व हे मध्यप्रदेशातील बालाघाट जिल्ह्यातील असून वनविभागाच्या बांबू तोडणीच्या कामासाठी या ठिकाणी आले होते. हे मजूर जंगलात काम करत असतांना अचानक अस्वलाने त्यांच्यावर हल्ला केला ज्यामध्ये धरमसिह टेकाम याचा जागीच मृत्यू झाला तर प्रेमलाल सयाम आणि संबल सिंह चौधरी गंभीर जखमी झाले. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळ गाठून घटनेचा पंचनामा केला. मृतक अस्वल हे नर असून त्याच्या अंगावर जखमांचे जुने व्रण आढळून आले आहे. त्यामुळे हे अस्वल पिसाळल्याने त्याने हल्ला केला असावा अशी शंका व्यक्त केल्या जात आहे.