उत्कृष्ठ शेतकरी पुरस्काराने भालचंद्र ठाकूर,भाजिपाले,मदनकर व गायधने सन्मानित

0
12

गोंदिया,दि.09- शिक्षण महर्षी स्व.मनोहरभाई पटेल यांच्या ११२ व्या जयंतीचे औचित्य साधून आज ९ फेब्रुवारी रोजी आयोजित कार्यक्रमात गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील उत्कृष्ठ शेतकरी,समाजसेवकांचा सत्कार करण्यात आला.समारोहाचे उद््घाटक उत्तरप्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या हस्ते प्रफुल्ल पटेल यांच्या अध्यक्षतेखाली गोंदिया तालुक्यातील उत्कृष्ठ युवा शेतकरी भालचंद्र ठाकूर,कामठा येथील तुकाराम भाजिपाले,लाखांदूर येथील अमृत मदनकर व साकोली येथील विनोद गायधने यांचा स्मृतीचिन्ह व पुष्पगृच्छ देऊन सत्कार  करण्यात आला.यावेळी समाजवादी पक्षाचे आमदार अबु आझमी, प्रसिध्द गायक सोनू निगम, हास्य कलावंत राजू श्रीवास्तव, उत्कर्ष पारेख, माजी मंत्री अनिल देशमुख, उमादेवी अग्रवाल,आ.प्रकाश गजभिये,वर्षा पटेल माजी मंत्री बंडूभाऊ सावरबांधे, विलास श्रृंगारपवार, नाना पंचबुध्दे, माजी. आ. अनिल बावणकर, रामरतन राऊत, दिलीप बन्सोड, सेवक वाघाये, मधुकर कुुकडे, विजय शिवणकर,नरेश माहेश्वरी,सुनिल फुंडे आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचालन माजी आमदार राजेंद्र जैन यांनी केले,तर आभार नरेश माहेश्वरी यांनी मानले.