गणखैरा येथे राजाभोज जयंती शनिवारी     

0
10

गोरेगाव,दि.09:- तालुक्यातील गणखैरा येथे शनिवार 10 फेब्रुवारी रोजी गणखैरा पोवार समाजाच्या वतीने राजाभोज जयंती आयोजित करण्यात आली आहे.10 फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ वाजता राजाभोज दिंडी काढण्यात येणार असून दुपारी 12 वाजता समारोहाचे उद्घाटन ओबीसी कृती समितीचे जिल्हाध्यक्ष बबलू कटरे यांच्या हस्ते अखिल भारतीय ओबीसी महासभा समन्वयक डॉ. खुशाल बोपचे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात येणार आहे. यावेळी दीपप्रज्वलक म्हणून अॅड. टी.बी.कटरे, पोवार प्रगतीशील मंचचे सचिव डॉ. संजीव रहांगडाले तर प्रमुख पाहुणे म्हणून अॅड. आरती भगत, अॅड. पटेल, दुर्गेश रहांगडाले, लिलेश्वर रहांगडाले, भागचंद्र रहांगडाले, सरपंच मायाताई कटरे, उषाताई रहांगडाले, अनंत ठाकूर, राजेश कटरे, विनोद पारधी आदी उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी चुन्नीलाल पारधी, देवीलाल गौतम, ईश्वर बिसेन, संजय पटले, राजेंद्र रहांगडाले, चतरु बघेले आदी प्रयत्नशील आहेत.