नगरसेविकेच्या वाढदिवसानिमित्त निशुल्क आरोग्य तपासणी शिबिर

0
10
गोंदिया,दि.09- येथील लायंस क्लब गोंदिया, रॉयल संजीवनी  व सेवा संस्था तसेच नारी शाक्ति महिला बजत गटाच्यावतीने नगरसेविका हेमलता पतेह  यांच्या वाढदिवसानिमित्त वार्ड क्रमांक 11 येथील जनतेसाठी चामट किराणा स्टोर्असजवळ निःशुल्क आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबिरात सिकलसेल, हिमोग्लोबिन,रक्तदाब,मधुमेह,दांत तपासणी कऱण्यात आली.यासाठी सपना खंडे विशेष सलाहकार, निशा डहाके, बिसेन,डॉ गौरव बग्गा,डॉ प्रियंका शेंडे यांच्यावतीने तपासणी करण्यात आली.शिबिराचे उदघाटन क्लब अध्यक्ष राजेश कनोजिया,एॅड सौ. हेमलता पतेह आणि सविता तुरकर यांच्या हस्ते करण्यात आले.प्रभागातील 245 नागरिकांनी या आरोग्य सेवेचा लाभ घेतला.यावेऴी  संजीवनी क्लब सचिव राजेश्वर कनोजिया,दिनेश कनोजिया,प्रतीक कदम,दिपक मिश्रा,विरेंद्र कटरे, नारी शक्ति बचत गटाच्या अनिता लिल्हारे, सारिका बरईकर, मोनिका सोनवाने, भावना बोरकर, कृष्णा चौहान, ममता चापले, शिला बावनकर, वृंदा गडेवार, स्वाति बालराजू, देवी किल्ली, कल्पना डहाके, रेखा काेरे यांच्यासह इथर सदस्यांनी सहकार्य केले.