लोकराज्य मराठी भाषा व साहित्य संमेलन विशेषांक ‍वाचनीय – मनोजकुमार सूर्यवंशी

0
18

भंडारा,दि.09 : या महिन्यात बडोदा येथे 91 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. त्याचप्रमाणे याच महिन्यात 27 फेब्रुवारीला ज्ञानपीठ पुरस्कार विजेते ज्येष्ठ साहित्यिक कुसूमाग्रजांच्या जयंतीनिमित्त मराठी भाषा दिवस साजरा केला जाणार आहे. हा सुवर्ण योग साधून माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने लोकराज्यचा विशेषांक साहित्य संमेलन व मराठी भाषा दिन या विषयावर काढला आहे. हा अंक अतिशय दर्जेदार, वाचनीय व संग्राह्य असाच असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोजकुमार सूर्यवंशी यांनी सांगितले. हा अंक साहित्यप्रेमींनी अवश्य वाचावा, असे आवाहन त्यांनी केले.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षक विनीता साहू, मुख्य कार्यकारी अधिकारी मनोजकुमार सूर्यवंशी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रवीशेखर धकाते, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. सुनीता बढे, जिल्हा माहिती अधिकारी रवी गिते, जिल्हा आरोग्य अधिकारी कमलेश भंडारी, शिक्षणाधिकारी माध्यमिक दत्तात्रय मेंढेकर उपस्थित होते.
या लोकराज्य अंकात शिक्षण व सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांची अतिथी संपादक म्हणून प्रस्तावना आहे. तसेच शारदादेवीची यात्रा, सारे काही मराठीसाठी…, प्रबोधनाचे शिल्पकार, यशोशिखरावर कसे जाल ?, आतापर्यंतची साहित्य संमेलने, अशी करावी अक्षरसाधना, मराठी आणि करिअर संधी, मराठी भाषेच्या रुपातील सांस्कृतिक वारशाचे जतन आणि संवर्धन, कार्पोरेट प्रशासनाचे सूत्रधार, समाज माध्यमांची शक्ती, डॉ. आंबेडकर थॉट : नवी संधी, पुरातत्वशास्त्र : शोध मानववंशाचा कौशल्यातून उन्नतीकडे, स्वप्नांना शिष्यवृत्तीचे बळ, यशदामध्ये नागरी सेवा, परीक्षेची तयारी, प्रशासकीय सेवेचा राजमार्ग, मॅग्नेटिक महाराष्ट्र गुंतवणूक परिषद 2018 व येथे कर माझे जुळती अशी अनेक सदरे आहेत.