जिल्ह्यात ठिकठिकाणी महाशिवरात्री महोत्सव १३ रोजी पासून

0
50

गोंदिया,दि.१२ः- महादेव भगवान शिव शंकर यांची आराधना करण्यासाठी मंगळवार १३ फेबुवारीपासून जिल्हयातील विविध तिर्थक्षेत्रात भाविकांची गर्दी उसळणार असून अनेक ठिकाणी यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यात विविध ठिकाणी पोंगेझराची यात्रेचे आयोजन करण्यात येत असताना दरवर्षी भाविक एकच गर्दी करताना दिसतात. यानुसार यंदाही अशीच गर्दी राहणार असल्याने आयोजकही भाविकांच्या सेवेसाठी सज्ज झाले आहेत.
‘त्रिलोकेश्वरधामातङ्क उसळणार भाविकांची गर्दी !
साकरीटोला : महाराष्ट्र राज्याच्या पूर्व टोकावर घनदाट जंगलानी व्यापलेल्या गोंदिया जिल्ह्याच्या अति संवेदनशील नक्षलगग्रत सालेकसा तालुक्याच्या पूर्व दिशेला नयनरम्य नैसर्गिक संपदेने व्यापलेला ‘त्रिलोकेश्वर धामङ्क सालेकसा तालुक्यातील मौजा हलबीटोला या छोट्याशा गावात स्थित आहे. याठिकाणी यात्राकाळात विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जात असून ११ फेबु्रवारीपासून यात्रेला सुरुवात होणार आहे.पाच दिवसीय यात्रेत विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. साध्वी गुनीताजी यांच्याद्वारे संगीतमय सत्संग प्रवचनाचे कार्यक्रम होणार आहे. १५ फेबु्रवारीला पूर्णाहुती ज्योती विसर्जन व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. महाशिवरात्री कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी त्रिलोकेश्वरधामचे अध्यक्ष दुलीचंद क्षिरसागर, सचिव दिवाकर भांडारकर, सुधीर भाडारकर, कैलाश अग्रवाल, शामसुंदर राठी व गावकरी परिश्रम घेत आहेत.
मेडकाबाई पहाडीः– सडक अर्जुनी : तालुक्यातील कोसमघाट गावाजवळील मेंडकाबाई पहाडीवर महाशिवरात्रीनिमित्त भव्य यात्रा व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून मेंडकाबाई पहाडीवर यात्रा भरते. यात्रेला परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होतात. कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
शिवधाम पिंडकेपारः– शिवधाम पिंडकेपार येथे १३ व १४ फेबु्रवारीपासून दोन दिवसीय महाशिवरात्रीची तयारी जोरात असून शिवयात्रेचे उद्घाटन गोंदिया नगर परिषदेचे नगराध्यक्ष अशोक इंगळे व नगरसेवक राजकुमार कुथे यांच्या हस्ते पार पडणार आहे.
महाशिवरात्री यात्रेत दोन दिवसीय भजन कीर्तन, दहीकाल्याचे आयोजन करण्यात आले असून शेवटच्या दिवशी महाप्रसाद करण्यात आले आहे. यात्रेच्या यशस्वीतेसाठी अनिलकुमार बिसेन, सुभाषसिंग बैस, देवेश मिश्रा, बंटी मिश्रा, दिलीप बिसेन आदी परिश्रम घेत आहे.
नागराधामः– दरवर्षी नुसार यंदाही शिवरात्रीच्या पावन पर्वावर नागराधाम येथे भक्तांची मंदियाळी राहणार आहेत. शिवरात्री महोत्सवाच्या औचित्यावर विविध धार्मिक सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.१३ फेबु्रवारी रोजी शिवरात्री महोत्सवानिमीत्त मुख्य उत्सव साजरा करण्यात येणार आहे. या दिनानिमित्त हवन पूजन व रात्रीला जागरणाचे आयोजन करण्यात आले आहे. १४ फेबु्रवारी रोजी शोभायात्रा, दहीहंडी महाप्रसाद व रात्रीला धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी शिवभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजनकांनी केले आहे.
महाशिवरात्री निमित्त महिला मेळावाचे आयोजन
गोरेगाव : तालुक्यातील डव्वा येथे पुरातन शिवमंदिरात शिव मंदिर समितीच्या वतीने महाशिवरात्री पर्वनिमीत्त मंगळवारी १३ फेबु्रवारी रोजी महिला मेळावा व विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या महिला मेळाव्यादरम्यान, विविध योजनांची माहिती उपस्थितांना देण्यात येणार असून हळदी-कुंकू, हस्तकला प्रदर्शनी, संगीत खूर्ची, पोष्टीक आहार प्रदर्शनी व विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. कार्यक्रमाचे उद्घाटन संजय गांधी समितीच्या अध्यक्षा माजी जिप सदस्या सिता रहांगडाले यांच्या अध्यक्षतेत माजी पं.स. सभापती चित्रकला चौधरी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यावेळी दिप प्रज्वलक म्हणून जिप सदस्य रोहिणी वरखडे, पं.स. सभापती माधूरी टेंभरे, सरपंचा माया कटरे राहणार आहेत. तर विशेष अतिथी म्हणून माजी पंस सदस्या कुंतन कटरे, सरपंचा अल्का पारधी, शुभद्रा रहांगडाले आदी प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. यावेळी परिसरातील महिलांनी जास्तित जास्त संख्येत या महिला मेळाव्यात उपस्थित राहून कार्यक्रमाचार लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
कटंगी (बु.) येथे महाशिवरात्री यात्रेचे भव्य आयोजन
गोरेगाव : कटंगी (बु) येथे कटंगी डॅमवर भव्य महाशिवरात्री यात्रेचे आयोजन दरवर्षी असते. या वेळी भाविकांची अलोट गर्दी असते. येथील मध्यम प्रकल्प पूर्ण विदर्भात प्रसिद्ध आहे. येथील भव्य मोठ्या त्रिशुल आकर्षणाच्या केंद्र असते. नैसर्गिक संपदेने परिपूर्ण देखावा या स्थानी असल्याले भाविकांची अलोट गर्दी असते. प्रथमच या यात्रेची पूर्ण तयारी ग्रा.पं.चे सरपंच तेजेंद्र हरिणखेडे हे आपल्या देखरेखीखाली गावकèयांच्या सहकार्याने करण्याचे ठरविले आहे. तिर्थक्षेत्राचा सर्वांगीण विकासाला शासनाचा निधी विकास कामांना देण्यात आल्यावर पर्यटन क्षेत्र म्हणून उदय होऊ शकतो.
मोक्षधामात भव्य शिव मूर्तीची स्थापना मंगळवारी
गोंदिया : स्व. देवीदास गोपलानी यांच्या स्मृतीत स्थानिक मोक्षधाम येथे सर्वसमाज मोक्षधाम सेवा समिती, विश्व qहदू परिषद व बजरंग यांच्या सहकार्याने मंगळवारी १३ फेब्रुवारी रोजी सकाळी ८:३० वाजता महाशिवरात्री निमीत्त भगवान शिव शंकर यांच्या विशाल मुर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे.
तेव्हा शहरातील सर्व भाविकांनी या प्राणप्रतिष्ठेच्या वेळी उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन सर्व समाज मोक्षधाम सेवा समिती, विश्व qहदू परिषद व बजरंग दलच्या वतीने करण्यात आले आहे.