१८ वर्षाचा काळ लोटूनही पुलाचे बांधकाम अर्धवटच

0
23

लोकप्रतिनिधीसह अधिकाèयांचे दुर्लक्ष,इंद्रावती व प्राणहितावरील पूल कधी होणार

गडचिरोली,(अशोक दुर्गम),दि.१२ः- जिल्ह्यातील मागास व शेवटच्या टोकावर असलेला सिरोंचा तालुक्यातून जाणाèया राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६३वरील इंद्रावती नदीवर तयार करण्यात येत असलेल्या पुलाच्या बांधकामाला १८ वर्षाचा काळ लोटत आला मात्र पुलाचे बांधकाम पुर्ण होण्याचे नाव घेईना अशी अवस्था झाली आहे.या अर्धवट पूलाच्या बांधकामामूळे या राष्ट्रीय महामार्गातून महाराष्ठ्र,छ्त्तीसगड व तेलंगणा राज्य जोडण्याचे स्वप्न अर्धवटच राहिले आहे.याला जबाबदार येथील लोकप्रतिनिधींसह अधिकाèयांचे झालेले अक्षम्य दुर्लक्षच कारणीभूत असल्याची चर्चा नागरिक करु लागले आहेत.त्यातच या महामार्गावर जागोजागी खड्डे पडल्याने वाहतुक कशी करावी अशा प्रश्न वाहनधारकांना पडला आहे. केंद्रसरकारच्यावतीने सन २००० मध्ये डावीकडवी योजनेतून अतिदुर्गम व नक्षलग्रस्त प्रभावीत या तालुक्यातून जगदलपूर ते निझामाबाद असा नव्या राष्ट्रीय महामार्गाला मंजूरी देण्यात आली होती.त्या रस्त्याच्या बांधकामाला सुरवात झाली.काही अंतरापर्यंत रस्त्याचे कामही झालेले आहे.परंतु याच महामार्गावर छत्तीसगड व महाराष््रटाला जोडणारा इंद्रावती नदीवरील पूल व महाराष्ट्र तेलगंणाला जोडणारा प्राणहिता नदीवरील पूलाचे काम आणि सिरोंचा तालूक्यातून जाणाèया ५७ किलोमीटर रस्त्याचे काम अजूनही अर्धवट असल्याने या महामार्गाच्या बांधकामाचा वनवास कधी संपणार अशी विचारणा सिरोचां परिसरातील जनता करु लागली आहे.