रामदेवबाबा हे सरकारी संत-आ.विनायक मेटे

0
30

संत साहित्य संमेलनात विविध पुरस्कारांचे वितरण

गोंदिया,दि.१७ः–अर्जुनी/मोरगाव येथील संत चोखोबा नगरीत आयोजित वारकरी साहित्य परिषद आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठान, नागपूर यांच्या वतीने आयोजित ७ व्या अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलनाचे आज शनिवारला(दि.१७) सूप वाजले.त्या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून बोलतांना शिवसग्रांम परिषदेचे अध्यक्ष व आमदार विनायक मेटे यांनी हे संत समेंलन खर्या साधू संताचे असून रामदेवबाबा हे मात्र सरकारी संत असल्याने त्यांच्या आणि आमच्या थोर संताच्या विचारात अंतर असल्याने सरकारी संताच्या मागे धावण्याची आवश्यकता नसल्याचे परखड विचार मांडले.
या संत समेंलनाच्या सांगता सोहळ्याला संमेलनाध्यक्ष ह.भ.प. डॉ.रामकृष्ण महाराज लहवितकर, स्वागताध्यक्ष पालकमंत्री राजकुमार बडोले,प्रमुख अतिथी म्हणून आदिवासी विकास राज्यमंत्री अमरीश राजे आत्राम, संमेलनाध्यक्ष हभप डॉ.रामकृष्ण महाराज लहवितकर, आमदार सर्वश्री विनायक मेटे, संजय पुराम, कृष्णा गजबे, जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, हभप बाबा महाराज राशनकर, माधव महाराज शिवनीकर, गोंदिया नगराध्यक्ष अशोक इंगळे, वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील, अ.भा.गुरुदेव सेवा मंडळाचे सरचिटणीस जनार्दन बोथे, भंते संघ धातू, कास्ट्राईब संघटनेचे अरुण गाडे, माजी अधिष्ठाता डॉ.ज्ञानेश्वर कडव आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.
पुढे बोलतांना मेटे म्हणाले की, यांनी ग्रामीण भागात आयोजित करण्यात आलेल्या या संत साहित्याबद्दल पालकमंत्र्याचे अभिनंदन करीत वारकरी संत साहित्याने महाराष्ट्राला समृध्द करण्याचे कार्य केल्याचे विचार व्यक्त केले.वारकरी संप्रदायाचे विचार आमच्या भागातील गावखेड्यात रूजले असून मराठवाड्याचा भाग हा संत सांधूंची भूमी आहे.आद्यकवी मुकूंदराज आमच्याच आंबेजोगाईचे असल्याने आम्हाला संत साहित्याच्या विचाराचा वारसा लाभला असल्याचे सांगितले.गावखेड्यात,शहरातही वारकरी संप्रदायाची पताका लागली असून संताच्या शिकवणीमूळे आपल्या राज्यात परिवर्तनाची चळवळीला बळ मिळाले आहे.संत साधूच्या कार्यक्रमासाठी कुणाला न्यायला जावे लागत नाही ही त्यांच्या कार्याची पावती आहे.अन्यथा आमचे सरकारी साधू संत रामदेवबाबा यांच्याबद्दल तर न बोललेच बरे असेही मेटे म्हणाले.संस्कृतातील साहित्याला बोलीभाषेत आणण्याचे काम तुकाराम महाराजांनी केले असून सध्याच्या परिस्थितीत त्यांच्या विचाराची गरज अशा साहित्य समेंलनातून जनतेला देण्याची आवश्यकता असल्याचे म्हणाले.
आदिवासी विकास व वन राज्यमंत्री राजे अम्बरीश आत्राम यांनी संत साहित्याबद्ल बोलतांना महानुभाव पंथापासून ते वारकरीसंप्रदायापर्यंच्या संत इतिहासाचा शोध घेतल्यास संत परपंरेची जोड असल्याचे बघावयास मिळत असल्याचे सांगितले.संत साहित्याला ज्यांनी व्यवस्थित समोर आणून अजरामर केले अशा वारकरीसाठी आळंदी येथे वारकरी विकास परिषदेच्यावतीने अभ्यास केंद्राची होणारी स्थापना परिवर्तनासाठी महत्वपूर्ण ठरणार असून संत साहित्याचा समावेश अभ्यासक्रमात करुन जागतिक पातळीवर पोचविण्यासाठी वारकरी संप्रदाय काम करीत असल्याचे विचार व्यक्त केले.
आरमोरीचे आमदार कृष्णा गजबे यांनी साहित्यांनी संतसाहित्याच्या प्रचारप्रसार किर्तनाच्या माध्यमातून करतांना पर्यावरणाचा होणारा èहास व प्रर्दुषण कसे टाळता येईल हे तुकारामांचे विचारही जनमानसात पोचविण्याची गरज असल्याचे म्हणाले.  यावेळी बोलतांना जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी विदर्भात वारकरी विचार पोचविण्यासाठी वारंवार अशाप्रकारचे कार्यक्रम घेणे आवश्यक असून जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून सहकार्य करण्याची संधी मिळाल्याचे मनोगत व्यक्त केले.
या सांगता समारंभात  राज्यामध्ये अमूल्य कार्य केल्याबद्दल तुकडोजी महाराजांना मरणोत्तर वारकरी विठ्ठल पुरस्कार जाहिर करण्यात आला होता.तो पुरस्कार राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे सेके्रटरी जनार्दन बोथे यांना व वारकरी साहित्य वारकरी संप्रदायाच्या विशेष सेवेसाठी जीवनगौरव पुरस्कार संत गाडगेमहाराज मिशनला देण्यात आले हा पुरस्कार बापूसाहेब देशमुख यांना आज प्रदान करण्यात आला.तत्पुर्वी हभप बापुसाहेब महाराज देहुकर यांचे काल्याचे किर्तन पार पडले.संचालन डॉ. दिलीप काकडे यांनी केले. आभार लायकराम भेंडारकर यांनी मानले.