झाडीपट्टीच्या बहिणाबाई अंजनाबाईची समेंलनाला हजेरी

0
24

गोंदिया,दि.१७ः-अर्जुनी मोरगाव येथे आयोजित ७ व्या संत साहित्य समेंलनात वारकरी संप्रदायात काम करणारे व संत साहित्यिक,कवी,कीर्तनकार अशा ज्येष्ठांचा सत्कार वारकरी परिषदेच्यावतीने करण्यात येणार होता.परंतु आज जेव्हा सांगता समारोपाच्यावेळी सत्कारमुर्तींची आकडा समोर आला,तेव्हा हा ज्येष्ठांचा सत्कार फक्त अर्जुनी मोरगाव विधानसभेच्या २०१९ च्या निवडणुका लक्षात घेऊन करण्यात आल्याची प्रचिती दिसून आली.विशेष म्हणजे या सत्कार समारंभाच्यावेळी एकही संत मात्र उपस्थित नव्हते.त्यातही पूर्व विदर्भातील झाडीपट्टीच्या भागातील बहिणाबाई म्हणून अंजनाबाई खुने यांचे नाव प्रामुख्याने घेतले जाते.ज्याठिकाणी हे संत साहित्य समेंलन घेण्यात आले.त्यास्थळापासून अवघ्या तीन ते चार किलोमीटर अंतरावर गाव असलेल्या अंजनाबाई खुने या भागातील बहिणाबाई असल्याची जाणीव वारकरी साहित्य परिषदेच्या अध्यक्षांसह त्यांच्या चमूला करून देण्यात आली होती.त्यानंतरही त्या संत साहित्य समेंलनाच्या एकाही परिसवांदात त्यांना स्थान न देता,ज्यांना झाडीपट्टीच्या इतिहासाचीही जाण नाही अशांचे नावे घालण्यात आली.झाडीपट्टीच्या बहीणाबार्इंचे नाव न घालून त्यांची अवहेलना ही राजकीयदृष्टीने आणि हेतुपुरस्सर केल्याची चर्चा अख्खा समेंलनस्थळापासून ते अर्जुनी मोरगावच्या प्रत्येक चौकात एैकावयास मिळत होती.त्यातही आपल्याला बोलावले नाही याचा राग न ठेवत वयाची ७० गाठल्यानंतरही झाडीपट्टीच्या बहिणाबाई म्हणजे अंजनाबार्इंनी मात्र श्रोत्यांत बसून कार्यक्रमाचा आनंद घेतला हा त्यांच्या मनाचा मोठेपणाच म्हणावे लागेल.