रिकामे मंडप,रिकामे स्टाॅल हेच कृषी प्रदर्शन आयोजकांचे यश

0
5

गोंदिया,दि.18 : कृषि तंत्रज्ञान व व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), कृषि विभाग व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांच्या संयुक्त वतीने १७ ते २१ फेब्रुवारी या पाच दिवशीय गोंदिया जिल्हा कृषि व पलास महोत्सवाचे आयोजन जिल्हा क्रीडा संकुल परिसरात करण्यात आले आहे.वास्तविक या कृषी प्रदर्शनाचे उदघाटन १७ फेब्रुवारीला सायकांळी ४ वाजता पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते होणार होते.परंतु संत साहित्य संमनेलनाचा सांगता समारोहच सायंकाळी 6 वाजेपर्यंत चालल्याने शनिवारला त्या कृषी प्रदर्शनाचे उदघाटन होऊ शकले नाही.ते आज सकाळी 11 वाजता होणार होते.परंतु दुपारी 12 पर्यंतही झालेले नव्हते.त्यातच काल ज्या शेतकर्यांना वाहनांनी आणण्यात आले होते.सत्कारमुर्ती आले होते त्यांना दिवसभर ताटकळत राहावे लागल्याने त्यांनी आज रविवारला येणेच टाळल्याचे चित्र रिकाम्या मंडपावरून बघावयास मिळाले.

विशेष म्हणजे जे प्रमुख वक्ते आमंत्रित करण्यात आले होते रमन मॅगसेसे पुरस्कारप्राप्त जलपुरूष डाॅ.राजेंद्र सिंह हे सुध्दा पोचले नाही.कारण काय तर त्यांना विदेशात एका कार्यक्रमासाठी जावे लागले.जर ते विदेशात गेले तर येथील कृषी अधिकार्यांनी त्यांचा नावाची कुणाकडून समंती घेतली होती हा विषय सुध्दा चर्चेचा ठरला असून कृषी प्रदर्शनाचे नियोजन पुर्णत ढासळले गेले आहे.त्यातही जिल्हा कृषी अधिक्षक यांनी नागपूरच्या एका खासगी वाहिनीवर,आकाशवाणीवर ,फ्लक्स,वृत्तपत्रात दरदिवशी 1 हजार पत्रके वाटूनही या कृषीप्रदर्शनाकडे नागरिकांनी फिरवलेली पाठ हे कृषी विभागातील अधिकारी व नियोजन अधिकार्यांच्या अकार्यक्षमतेचा परिचय देणारे ठरले आहे.भव्यदिव्य अशा पटांगणात मोठ मोठे शेड उभारुन त्यात स्टाॅल लावण्यात आले.परंतु त्यात अनेक स्टाॅलचे कक्ष हे रिकामेच दिसून आले.काही मोजकेच स्टाॅल लावलेले होते.व्यवसायिक स्टाॅलमात्र भरपूर होते.

जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाने स्टाॅल लावला असून या विभागाने गौशालेतील गायी आणून आपल्या स्टाॅलची शो वाढविली आहे.मात्र एखाद्या खेड्यातील सर्वसाधारण शेतकर्याने आपल्या घऱी याभागातील एखाद्या गायीमूळे दुग्धव्यवसायात क्रांती करुन समृध्द झाला असा दाखविण्यात अपयशी ठरले असून प्रदर्शनात काही तरी दाखवून पैशा खर्च करायचे हे ठेवूनच नियोजन असल्याचे दिसून आले.त्या मंडपात बसलेले कर्मचारी सुध्दा उपकारासाठीच बसल्यासारखी भाषा वापरत असल्याने जिल्हा परिषदेचा हा मंडप निव्वळ देखावा ठरला आहे.