कृषीअधिक्षक म्हणतात आमचे प्रदर्शन नव्हेच;महोत्सवाचे दोनदा उद्घाटन

0
7

दोनवेळच्या जेवणासह चहानास्तासाठी 150 रुपये

गोंदिया,दि.१८ः येथील जिल्हा क्रिडा संकुल परिसरात आयोजित कृषी प्रदर्शन दुपारीच सपंले असून उर्वरित कार्यक्रमाशी आमचा काहीच संबध नाही.तो कार्यक्रम महिला आर्थिक विकास महांंडळाशी संबधित असल्याने आमचा काय संबध अशी माहिती कार्यक्रमस्थळी हजर असलेल्या पत्रकाराना जिल्हा कृषी अधिक्षक अनिल इंगळे यांनी भ्रमणध्वनीवर देत आपली अनास्था दाखविली. कृषी तंत्रज्ञान व व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), कृषी विभाग व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांच्या संयुक्त विद्यमाने १७ ते २१ फेब्रुवारी या पाच दिवशीय जिल्हा कृषी व पलास महोत्सवाचे आयोजन जिल्हा क्रीडा संकुल, मरारटोली, साईनगर येथे करण्यात आले आहे. मात्र या महोत्सवाचे सलग दोनदा उद्घाटन झाल्याने या महोत्सवाची चांगलीच चर्चा आहे. तर कृषी विभागाचे ढिसाळ नियोजन आणि जनजागृतीचा अभावाचा या महोत्सवाला फटका बसल्याचे चित्र होते.१७ फेब्रुवारी रोजी दुपारी ४ वाजता आ. गोपालदास अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, जि.प.अध्यक्ष सीमा मडावी, मुकाअ राजा दयानिधी उपस्थित होते. १८ फेब्रुवारी रोजी दुपारी १.३० वाजता पुन्हा पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. या वेळी जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, मुकाअ राजा दयानिधी, जि.प. जि.प. सभापती शैलजा सोनवाने, अ.भा. भाजीपाला उत्पादक संघाचे अध्यक्ष श्रीराम गाढवे व प्रगतीशिल शेतकरी उपस्थित होते.

रात्रीच्या सांस्कृतिक कार्यक्रमातही गर्दी नव्हती.येथे आलेल्या अनेकांनी आधीसारखे गर्दी नसून दुकानामध्ये पाहिजे तशी सुविधा नसल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली.दरम्यान आत्माचे प्रकल्प संचालक हिंदुराव यांनी कृषी प्रदर्शनाचे उदघाटन कालच झाले. परंतु आज पालकमंत्री यांनी भेट दिल्यानंतर पुन्हा उदघाटन केल्याची  माहिती पत्रकारांना भ्रमणध्वनीवर दिली.रात्री 7 नंतर मात्र जिल्हा कृषी अधिक्षक अनिल इंगळे,आत्माचे प्रकल्प संचालक हिंदूराव चव्हाण,माविमचे अधिकारी हे कुणीही रात्री 8.30 म्हणजे कार्यक्रम संपेपर्यंत प्रदर्शनस्थळावर हजर नव्हते.त्यातच ज्या महिला बचत गटाच्या महिलांनी स्टाॅल लावले त्यांची जेव्हा मुलाखत घेण्यात आली,तेव्हा त्यांनी दोनवेळचे जेवण व सकाळ व दुपारच्या चहा नास्त्यासाठी आयोजकांनी फक्त 150 रुपये दिल्याचे सांगत एवढ्यात जेवण आणि चहा नास्ता एकवेळचे होत नसताना दोन वेळचे आम्ही कसे करीत असणार अशी व्यथा मांडली.गेल्यावर्षीपर्यंंत आमच्या साहित्याला खरेदीदार तरी किमान शहरात मिळायचे यावर्षी तर याठिकाणी कुणीच येत नसल्याने विक्रीच होत नसल्याची खंत व्यक्त केली.काही महिलांनी तर गेल्यावर्षी चंद्रपूरात 250 रुपये दिवसाकाठी एका महिलेला जेवण,नास्त्यासाठी मिळत होत असे सांगत येथे मात्र कमी पैसे मिळत असल्याची कबूली दिली.ज्याठिकाणी राहण्याची सोय करण्यात आली,तिथे पलंगांची सोय नसून खाली बिछाणालावूनच झोपावे लागत असल्याचेही सांगितले.