नरेंद्राचार्य महाराज यांचे प्रवचन व साधक दिक्षा दर्शन सोहळा बुधवारी

0
17
गोंदिया,दि.१८ ः-गोंदिया जिल्हा भक्त सेवा मंडळाच्या वतीने अनंत विभूषीत जगतगुरू रामानंदाचार्य श्री. स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांचा प्रवचन व दर्शन सोहळा स्थानिक नवीन कृषी उत्पन्न बाजार समितीजवळील पटांगणात बुधवारी २१ फेबु्रवारी रोजी आयोजित करण्यात आला आहे. सकाळी ९ वाजता या कार्यक्रमाला सुरुवात होणार असून शहरातील गांधी चौक ते कार्यक्रमस्थळ अशी भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे.
दरम्यान, कार्यक्रमानिमीत्त श्रीं.चे पादुका आगमन, गुरूपुजन, श्री. लिलांमृत ग्रंथाचे पारायण, आरती सोहळा, प्रवचन, साधक दिक्षा, दर्शन व पुष्पवृष्टी आदी कार्यक्रमही घेण्यात येणार आहेत. सद्याच्या धावपळीच्या जीवनात माणूस यंत्रवत होत चालला असून भौतिक सुखात लोळण घेणारा माणूस अंतकरणातून मात्र कधी-कधी हताश, निराश आढळतो. आध्यात्मामुळे संयम, समय सुचकता, नेतृत्वगुण, परिपक्वता, चिकाटी, दुरदृष्टीकोण अशा विविध गुणांनी माणूस विकसित होतो. यामुळे परोपकार, लिनता, शूरता, ध्येर्य या गोष्टी अंगीकृत होतात. श्री नरेंद्राचार्य महाराज सदैव सांगतात की डोळे विज्ञानवादी, मन अध्यात्मवादी आणि बुध्दी वास्तववादी ठेवा. या त्रिसुत्रीमुळे जीवनात सुख, शांती समाधान, स्थैर्य साधता येते. आध्यत्मामुळे, सात्वीकता येत असल्याने जगण्याची उमेद वाढून जीवनात प्रेम, आनंद व उत्सव निर्माण होतो. तेव्हा या महंमंगल समयी सहकुटुंब उपस्थित राहून मनोकामनापुर्तीत भर घालण्याचे आवाहन जिल्हा भक्त सेवा मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.