ग्राम विकासासाठी संविधानाचे पारायण गावागावातून होणे गरजेचे- जे.एस.शिंदे

0
11
आकाश पडघन,वाशिम दि.19ः- महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती वाशीम शाखेच्या वतिने आयोजित सरपंच व ग्रामसेवकांच्या शिबिरात ग्रामविकासासाठी सविंधानाचे पारायण गावागावातून होणे गरजेचे असल्याचा मौलिक संदेश जे.एस.शिंदे यांनी दिला. शिबिराच्या अध्यक्षस्थानी एसबिआय बँकेचे नोडल ऑफीसर हंसराज शेंडे हे होते. तर प्रमुख मार्गदर्शक म्हणुन महा. अंनिसचे जिल्हा कार्याध्यक्ष पी. एस. खंदारे,गुरूदेव सेवामंडळ मंगरूळपीर कारंजाचे प्रचारक वाघ, आंबेडकरी चळवळीतील जेष्ठ कार्यकर्ते मधुकर जुमडे, अंनिसचे सचिव प्रा.ऊन्मेश घुगे,सल्लागार राजीव दारोकार, निलेश भोजने,भारिपचे तालुका अध्यक्ष बालाजी गंगावने, दतराव वानखेडे,विश्वनाथ इंगोले,विविध ऊपक्रम विभाग प्रमुख सुनिल कांबळे,अंनिसचे जिल्हाध्यक्ष विनोद तायडे,महिला विभाग प्रमुख कुसुमताई सोनुने, सरपंच निता राठोड, सरपंच विनोद पट्टेबहादुर आदी मान्यवर उपस्थित होते. शिबिराच्या प्रारंभी महामानव डाॅ .बाबासाहेब आंबेडकर,महात्मा जोतिराव फुले यांच्या प्रतिमेस पुष्पमाला अर्पन करून संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामुहीक वाचन करण्यात आले. संविधानावर आधारित सुनिल  स्वामी इचलकरंजी यांनी रचलेल्या पोवाड्याचे गायन शाहीर नामदेव दिपके यांनी केले.प्रास्ताविक पी एस खंदारे यांनी केले.वैज्ञानिकदृष्टीकोणातून पाण्यावर दीपप्रज्वलन करून जे एस शिंदे यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले.या शिबिराला वाशिम तालुक्यातील ग्रामसेवक,सरपंच,ग्रामविकास अधिकारी उपस्थित होते.त्यांना यावेळी सविंधान भेटस्वरुप देण्यात आले. संचालन प्रा.अशोक वाघ व प्रा.डि. एस. गोरे यांनी केले तर आभार विनोद तायडे यांनी मानले.