विद्ममान सरकार शेतकरी विरोधी-चंद्रिकापूरे

0
8

अर्जुनी मोरगाव,दि.19ःृ शेतकरी कर्जमाफीच्या नावाखाली सरकारकडून शेतकऱ्यांची दिशाभूल केली जात आहे. एकीकडे २५ ते ३० हजारांच्या कर्जासाठी शेतकऱ्यांकडे तगादा लावला जातो. मात्र दुसरीकडे व्यापाऱ्यांना हजारो कोटीचे कर्ज दिले जात आहे. सरकारला शेतकऱ्यांपेक्षा व्यापाºयांची काळजी अधिक आहे. हे शेतकऱीविरोधी सरकार असल्याेच शेतकर्यांवर आत्महत्येची वेळ येऊ घातल्याची टिका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी मनोहर चंद्रिकापुरे यांनी केली आहे.ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने सुरु करण्यात आलेल्या शेतकरी दिंडीच्या चौथ्या दिवशी गोठणगाव जिल्हा परिषद क्षेत्रातील गोठणणगावच्या बाजार चौकात आयोजित सभेत बोलत होते. तिरखुरी येथून बिरसा मुंडाच्या मंदिरातूून सुरूवात करण्यात आलेली ही दिंडी आज चौथ्या दिवशी सुरबन,उमरपायली,डोंगरगाव,जांभळी,गंधारी,बोंडगाव,कढोली, प्रतापगड़,रामनगर,संजयनगर, या गावातून भ्रमण करीत गोठणगाव येथे पोचली.
याप्रसंगी प्रामुख्याने महिला राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष सुशीला हलमारे,माजी जि.प.सदस्य रतीराम राणे,निर्मला ईश्वर,सरपंच शुभांगी तिडके,विनायक कराडे आदी उपस्थित होते. सभेला शेकडोच्या संख्येने शेतकरी, शेतमजुर,बेरोजगार, विद्यार्थी उपस्थित होते.