खाजगी ऑटोरिक्षा वाहन परिवहन संवर्गात नोंदणीची मुदत ३१ मार्च

0
11

गोंदिया,दि.२० : राज्य शासनाने एका अधिसूचनेद्वारे महाराष्ट्र मोटार वाहन नियम १९८९ यात आणखी सुधारणा करुन महाराष्ट्र मोटार वाहन नियम १९८९ च्या नियम ७५ अ मध्ये पुनर्नियम नव्याने दाखल करण्यात आले आहे. त्यानुसार खाजगी संवर्गात नोंदणी असणारी ऑटोरिक्षा नवीन परवान्यावर नोंदणी करतांना अथवा सध्याच्या वैध परवान्यावर बदली वाहन म्हणून नोंदणी करतांना नियम ७५ (१) मधील खंड क व या नियमाचा उपनियम १ मध्ये नमूद केलेल्या शुल्क व्यतिरिक्त पुढीलप्रमाणे अतिरिक्त परवाना शुल्क आकारण्यात येईल.
ऑटोरिक्षा प्रथम नोंदणी दिनांकापासून एक वर्षापेक्षा कमी कालावधी झाला असल्यास १००० रुपये. ऑटोरिक्षा प्रथम नोंदणी दिनांकापासून एक वर्षापेक्षा अधिक आणि दोन वर्षापेक्षा कमी कालावधी झाला असल्यास २००० रुपये. ऑटोरिक्षा प्रथम नोंदणी दिनांकापासून दोन वर्षापेक्षा अधिक आणि तीन वर्षापेक्षा कमी कालावधी झाल्या असल्यास ३००० रुपये. ऑटोरिक्षा प्रथम नोंदणी दिनांकापासून तीन वर्षापेक्षा अधिक आणि चार वर्षापेक्षा कमी कालावधी झाला असल्यास ४००० रुपये. प्रथम नोंदणी दिनांकापासून चार वर्षापेक्षा अधिक कालावधी झाल्या असल्यास ५००० रुपये अतिरिक्त परवाना शुल्क आकारण्यात येईल अथवा वसूल करण्यात येईल.
खाजगी संवर्गात नोंदणी झालेल्या ऑटोरिक्षा परिवहन संवर्गात नोंदणी करण्याची मुदत ३१ मार्च २०१८ पर्यंत आहे. या मुदतीनंतर असे विना परवाना प्राप्त वाहने रस्त्यावर तपासणीद्वारे आढळून आल्यास वाहनाचे मोटार वाहन कायद्यानुसार नोंदणी रद्द करण्यात येईल. असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय चव्हाण यांनी कळविले आहे.