मौखिक आरोग्य तपासणी कार्यक्रम उत्साहात

0
19

गोंदिया,दि.२० : केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालय येथे दंत विभागाअंतर्गत ४ फेब्रुवारी जागतिक कर्करोग दिन म्हणून ३ ते १७ फेब्रुवारी या कालावधीत कर्करोग पंधरवाडा साजरा करण्यात आला. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली तंबाखुच्या दुष्परिणाबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.देवेंद्र पातुरकर उपस्थित होते. जिल्ह्यातील सर्व शाळांमधून शालेय विद्यार्थ्यांना तंबाखूच्या दुष्परिणामांची माहिती व्हावी यासाठी पोस्टर स्पर्धा आयोजित करण्यात आली. १६ फेब्रुवारीला केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयातील दंत विभागात मौखिक आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले. सर्व रुग्णांची तपासणी शरद पवार दंत महाविद्यालय व रुग्णालय सावंगी वर्धा येथील कर्करोगतज्ञ चमूकडून रुग्णांची तपासणी करुन निदान करण्यात आले. कार्यक्रमात दंत शल्यचिकित्सक डॉ.स्मृती अडूलकर, डॉ.दिपाक्षी कोल्हटकर, दंत आरोग्यतज्ञ फरहान खान, सुरेखा मेश्राम, जुबेर इनामदार, संध्या शंभरकर, तार्केश उके, विवेकानंद कोरे यांनी सहकार्य केले.