एस.एस.एस.संघटनेच्या स्तुत्य उपक्रम

0
11

सिरोंचा,दि. २६ (अशोक दुर्गम):  गडचिरोली जिल्ह्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या सिरोंचा येथील युवक आणि एस.एस.एस. संघटनेसह कलेश्वरामच्या संयुक्त विद्यमाने  अनोखा उपक्रम राबवून माणुसकीचा परिचय दिला आहे.या स्तुत्य अशा उपक्रमार्फेत संघटनेचे पदाधिकारी आणि सिरोंचातील युवकांनी कलेश्वराम देवस्थान परिसरात भटकत असलेल्या मनोरुग्ण इसमांची सेवा करुन त्यांना अंघोळ घालणे,कटिंग-दाढी करुन स्वच्छ केल्यानंतर भोजन व वस्त्रदान करुन माणुसकीचा परिचय करुन दिला.देवस्थान परिसरात अनेक दिवसांपासून काही मनोरुग्ण परिस्थीतील इसम फिरत असल्याचे समाजकार्य करणार्या युवकांच्या लक्षात आले.भाविकांकडे भिक्षा मागून तसेच परिसरातील नागरिकांकडून अन्न मागू आपली भूक भागविणार्या मनोरुग्णाची सेवा करण्याचा निर्धार एस.एस.एस.संघटन आणि सिरोंचा येथील युवकांनी हाती घेतला.या उपक्रमात रंजित गागापूरवार,दिवाकर तनामलवर,रोहीत ,श्रावण, कार्तिक, रमण जेक्का सहभागी झाले होते.