६५ ग्रा.पं.च्या ११६ जागांकरिता आज होणार निवडणूक

0
14
गोंदिया,दि. २६ :: राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील ग्रामपंचायतीचे पोटनिवडणुकीचा जाहीर केलेला निकाल २५ फेब्रुवारी रोजी जिल्ह्यातील ६५ ग्रामपंचायतीचे ११६ जागांकरिता निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता. मात्र, उमेदवारांना आॅनलाइन अर्ज भरण्यास अडचणी आल्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने २५ फेब्रुवारी ऐवजी २७ फेब्रुवारीला मतदान घेण्याचे आदेश दिल्यावरून आज मतदान होणार असून तिरोडा तालुक्यातील निवडणूक बिनविरोध झाल्याने तिरोडा तालुक्यात मतदान होणार नाही.
२५ फेब्रुवारी रोजी जिल्ह्यातील ६५ ग्रामपंचायतीमधून ११६ रिक्त जागांकरिता निवडणूक घेण्याचे निवडणूक आयोगाने जाहीर केले होते. त्यानुसार सर्व निवडणूक प्रक्रिया सुरू करण्यात आली असतानाच ५ ते १२ फेब्रुवारीपर्यंत निवडणुकीकरिता उमेदवारी अर्ज आॅनलाइन पद्धतीने मागविण्यात आले होते. परंतु आॅनलाइन अर्ज भरण्यास तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने अनेक ठिकाणी उमेदवारी अर्ज भरण्यास अडचणी आल्याने अर्जच भरण्यात आले नव्हते. ज्यामुळे निवडणूक आयोगाने दोन दिवस ही प्रक्रियासमोर ढकलून पोटनिवडणुकीकरिता होणारे मतदान २५ फेब्रुवारी ऐवजी २७ फेब्रुवारीला जिल्ह्यातील ६५ ग्रामपंचायतीमधून ११६ सदस्यांकरिता मंगळवार, २७ फेब्रुवारी रोजी सकाळी ७.३० ते ३ वाजतादरम्यान ईव्हीएम मशीनद्वारे मतदान घेण्यात येणार असून तिरोडा तालुक्यातील सहा ग्रामपंचायतीमधून दहा जागांकरिता मतदान होणार होते.
मात्र, मारेगाव येथे एका जागेकरिता एकही अर्ज न आल्याने तर इतर ग्रामपंचायतीच्या ९ जागांकरिता केवळ एक-एकच अर्ज आल्याने तिरोडा तालुक्यात मतदान होणार नसून जिल्ह्यात इतर जागी होणाºया मतदानाची मतमोजणी बुधवार, २८ फेब्रुवारीला होणार असल्याची माहिती निवडणूक विभागातर्फे देण्यात आली असून निवडणुकीबद्दल हा बदल राज्य निवडणूक आयोगाचे अवर सचिव आर.बी. फणसेकर यांच्या आदेशानुसार होणार आहे.