स्त्रियांनी सावित्रीबाईंचे विचार आत्मसात करावे- वर्षा पटेल

0
21

गोंदिया/तुमसर,दि.१४ :: क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंनी स्त्री शिक्षणाची ज्योत प्रज्वलित केली. त्यामुळे आज प्रत्येक क्षेत्रात स्त्री पुरूषांच्या खांद्याला खांदा लावून यशोशिखर गाठत आहे. शहरी भागातील स्त्रियांच्या तुलनेत ग्रामीण भागातील स्त्रिया विकासात मागे पडत आहेत. त्यांनी सावित्रीबाईंचे विचार आत्मसात करून यशोशिखर गाठावे, असे प्रतिपादन मनोहरभाईपटेल अँकेडमीच्या अध्यक्षा वर्षा पटेल यांनी व्यक्त केले.त्या तुमसर तालुक्यातील सिहोरा येथील जसवंती लॉन येथे आयोजित महिला मेळाव्याप्रसंगी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाला राष्ट्रवादी महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षकल्याणी भुरे, जि. प. सदस्य प्रेरणा तुरकर, महिला व बालकल्याण सभापती रेखा ठाकरे, जि. प. सदस्य शुभांगी रहांगडाले, सभापती धनेंद्र तुरकर, सरपंच मधू आडमाचे उपस्थित होते. दरम्यान, उपस्थित मान्यवरांनी महिलांना मार्गदर्शन केले.मेळाव्याचे संचालन सरपंच उमेश कटरे यांनी तर आभार पं. स. सदस्य राजेंद्र ढबाले यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी जि.प. सदस्य प्रतिक्षा कटरे, संगीता सोनवाने, गीता माटे, पं. स. सदस्य अरविंद राऊत, दिलीप सोनवाने, जितेंद्र तुरकर, देवचंद ठाकरे यांनी पर्शिम घेतले.

गोंदिया: राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्यावतीने गोंदिया, तिरोडा व आमगाव येथे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिला मेळावा मनोहरभाई पटेल अकादमीच्या अध्यक्षा वर्षा पटेल यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आले. या महिला मेळाव्यात वर्षा पटेल यांनी महिलांना संगठीत होण्याचे आवाहन करीत सावित्रीबाई फुलेंच्या विचारांचे आत्मसात करुन सक्षम व्हावे असे विचार व्यक्त केले.
गोंदिया येथे विमलताई शाळेच्या प्रांगणात शहर महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने आयोजित मेळाव्यात त्या बोलत होत्या. या मेळाव्याला जि.प.सदस्या दुर्गा तिराले, आशा ताई पाटिल, पुस्तकला माने, कुन्दा दोनोडे, लता राहंगडाले, सुदर्शना वर्मा, डॉ लक्ष्मी गुप्ता, गिता मिसार, रेखा देशमुख, लक्ष्मी बांडेबुच्चे, भाग्यश्री चौधरी, माया राहंगडाले यांच्यासह परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
आमगाव- येथील विद्या कान्व्हेंट येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला कविताताई राहंगडाले, प्रभाताई माहेश्वरी, वंदना बोरकर, उषा हर्षे, सुशीला भालेराव, अर्चना तराम, सुमन बिसेन, प्रिया हरिनखेड़े, लष्मी बिसेन, रर्वीं. सीमा शेंडे, संगीता दोनोडे, लष्मी ऐड़े, जयश्री पुंडकर, हरविला मड़ावी, सिंधु भूते, अंजली बिसेन, शिला हजारे, सविता बघेले, ग्राम सरपंच सदस्य बचत गट सदस्य, आंगनवाड़ी सेविका व मदतनिस उपस्थित होते.
तिरोडा- येथील कुंभारे लॉन येथे आयोजित महिला मेळाव्याला राजलक्ष्मी तुरकर, दुर्गा तिराले, नीता राहंगडाले, ममता बैस, सुनीता मडावी, प्रिया हरिनखेड़े, अर्चना जैस्वाल, खुशबू टेंभरे, रजनी गौतम, उषा किंदरले, वीणा बिसेन, प्रीति रामटेके, संध्या गजभिये, माया शरणागत, कुंदा दोनोडे यांच्यासह नगरपरिषद,जिल्हा परिषद,पंचायत समिती,ग्रामपंचायत सदस्या उपस्थित होते.