पत्रकारिता क्षेत्रात गुन्हेगार व लबाडांचा कब्जा

0
7

चंद्रपूर,दि.१७ः–मागील २५ वर्षांपूर्वी पत्रकारिता क्षेत्र सुरळीत आणि सुरक्षित होते. मात्र आता या क्षेत्रात वर्चस्व स्थापना करण्यासाठी गुन्हेगार व लबाडांनी कब्जा केल्याचे दिसते. पत्रकार हा समाजाचा ‘आरसा’ असे जनतेकडून संबोधल्या जात होते आणि आजही आहे. पण क्षेत्राला काही संधीसाधू लोकांनी कलंकीत केले आहे. आपले बेकायदेशिर धंदे सुरळीतपणे चालु रहावे यासाठी काही लोकांनी पत्रकारिता क्षेत्रात प्रवेश केला आहे.तर काहींनी वृत्तपत्र न काढताच संपादक म्हणून मिरवून घेण्यास सुरवात केली असून अशांना साथ देणार्यामुळेही पत्रकारिता क्षेत्र बदनाम होऊ लागले आहे.
दरम्यानच्या काळात ज्यांना एक वाक्यही ‘धड’ लिहीता येत नाही असे ही पत्रकार बणवून ‘तोरा’ मिरवतांना दिसत आहेत. तर अधिकार्‍यांकडे जावून चिरमिरी घेवून बनवाबनवी करति असल्याचे एक अधिकार्‍यांनी सांगितले. परंतु माझे नांव येऊ देवू नका असे ही आमचे प्रतिनिधी जवळ सांगण्यात आले.
पत्रकार किंवा वार्ताहर हा समाजातील अन्यायग्रस्त लोकांना आपल्या लेखणीतून व लेखणी माध्यमातून न्याय मिळवून देणारा एक शिपाई आहे. त्याची वर्तणूक चांगली व स्वच्छ असावी, समाजाने त्याचा आदर करावा असे एकंदरित त्याचे वागणे असावे. पण आता मात्र बदनाम लोकांनी या क्षेत्रात प्रवेश केला आहे. कोणत्याही वृत्तपत्राचे प्रतिनिधी, वार्ताहर नसतांना पत्रकार आहे असा ‘तोश’ मिरवित असल्याचे शहरात चित्र पहावयास मिळत आहे. यामुळेच खरा पत्रकार लोप पावत असल्याचे चित्र दिसत आहे.