पाणी पुरवठा विभागाच्यावतीने जलसंधारण समिती सदस्यांना टॅबचे वितरण

0
8
गोंदिया,दि.21ः-गोंदिया जिल्हा परिषदेच्या पदाधिकाèयाच्या अडीच वर्षाचा कार्यकाळ जानेवारीत संपला.त्यानंतर झालेल्या एका जलसंधारण समितीच्या बैठकीत ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्यावतीने त्या समितीमधील सदस्यांना एका अधिकाèयाने टॅबचे वितरण केले.वास्तविक जलसंधारण समितीमध्ये टॅब खरेदीसाठी कुठेही निधीची तरतूद नाही.त्यातही जलसंधारण समितीच्या सदस्यांना ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी जर टॅब वितरीत करीत असतील तर तो कुठल्या निधीतून हा प्रश्न समोर आलेला आहे.कारण तत्कालीन उपविभागीय अभियंता शर्मा यांच्यावर अनामत रक्कमही बिलाच्या रकमेत वापरल्याचा ठपका ठेवून कारवाई करण्यात आली.मग टॅब खरेदीसाठी कुठल्या योजनेचा वापर करण्यात आला qकवा त्या अधिकाèयाचे वेतन तेवढे आहे का की स्वखुशीने आपल्या वेतनातून त्या टॅबचा खर्च केला हा सर्व आत्ता चर्चेचा विषय सुरु झालेला आहे.मात्र जिल्हा परिषदेत आता टॅब वितरणाची एक नवी परंपरा या कार्यकाळात सुरु झाली हे मात्र निश्चित झाले आहे.