बाजार वसुलीसाठी १६.५५ लाखांची बोली

0
6

गोंदिया,दि.१ः नगरपरिषदेच्या बैठकी बाजार वसुलीसाठी काढण्यात आलेल्या ई-लिलावात एका इच्छुकाने १६.५५ लाखांची सर्वाधिक बोली लावली.विशेष म्हणजे नगरपरिषदेने 11.50 लाख रुपयाची अपेक्षा ठेवली होती.परंतु यासाठी ई निविदा भरलेल्या तीन इच्छुक वसुली ठेकेदारांनी आॅनलाईन बोलीत सहभाग घेतला होता.त्यामध्ये खालीद पठाण,पप्पू पटले यांच्यासह एकाचा समावेश होता. शेवटच्या तासात पप्पू पटले यांनी 1.50 लाख रुपयाचा आकडा वाढविल्याने ही आजपर्यंतंचा बाजार लिलाव विक्रीची सर्वात मोठया बोलीची नोंद झाली आहे.पटले यांनी शेवटी लावलेल्या बोलीनुसार 16.55 लाख रुपयाची बोली असून नियमाप्रमाणे हा कंत्राट बैठकी बाजार वसुलीसाठी मिळणार असल्याची माहिती आहे. मात्र, आता हा विषय स्थायी समितीच्या सभेत मंजुरीसाठी ठेवला जाणार आहे.
नगराध्यक्ष अशोक इंगळे यांनी मागील वर्षी फेब्रुवारी महिन्यात त्यांच्या पदग्रहाण समारंभात बैठकी बाजार वसुली बंद करण्याची घोषणा केली होती. तेव्हापासून नगर परिषदेची बाजार वसुली बंद झाली होती. अशात नगर परिषदेला वार्षिक सुमारे सात लाख रुपयांचा तोटा सहन करावा लागत होता. शिवाय नगर परिषद अधिनियमांत बाजार वसुली बंद केल्यास तेवढय़ाच रकमेची पर्यायी व्यवस्था करावी असे नमूद आहे.
यावर बैठकी बाजार वसुलीसाठी १0 मार्च रोजी निविदा काढली होती. या निविदेंतर्गत २६ तारखेला ई-लिलाव करण्यात आला. त्यात इच्छुकांकडून ऑनलाईन बोली लावण्यात आली. यामध्ये शहरातील एका इच्छुकाने १६ लाख ५५ हजार रुपयांची सर्वाधिक बोली लावली. त्यामुळे याच व्यक्तीला बैठकी बाजार वसुलीचे कंत्राट दिले जाण्याची शक्यता आहे. त्यापूर्वी हा विषय दर मंजुरीसाठी स्थायी समितीच्या सभेत ठेवला जाणार आहे. कंत्राटाची माळ कुणाच्या गळ्यात पडते याकडे नागरिकांच्या नजरा लागल्या आहेत.