‘ओबीसी’ जनगणना संविधानिक न्याय यात्रा २८ ला गडचिरोलीत 29 ला गोंदियात

0
14

गडचिरोली/गोंदिया,दि.05-ओबीसींची जातनिहाय जनगणना झालीच पाहिजे. या प्रमुख मागणीला घेऊन देशव्यापी ओबीसी जातनिहाय जनगणना अभियानांतर्गत संविधानिक न्याय यात्रा ११ एप्रिल २0१८ रोजी समता भूमी महात्मा फुले पेठ पुणे येथून सुरू होणार असून शेवट ११ मे २0१८ रोजी चैत्यभूमी दादर मुंबई येथे होणार आहे. ही यात्रा ३२ जिल्ह्यातून जाणार असून गडचिरोली येथे २८ एप्रिल रोजी सकाळी १0 वाजता पोहचणार आहे.गोंदियात 29 एप्रिलरोजी ही यात्रा येणार असल्याची माहिती विदर्भ निमंत्रक ओबीसी जनगणना अभियानाचे प्रा. रमेश पिसे यांनी दिली.
या यात्रेचे नेतृत्व मुंबईचे माजी खा. तथा आ. हरीभाऊ राठोड, यतमाळचे डॉ. ज्ञानेश्‍वर गोरे, पुणेच्या प्रा. सुषमा अंधारे, नाशिकचे प्रा. श्रावण देवरे,राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे,ओबीसी सेवा संघाचे इंजि. प्रदीप ढोबळे, परभणीचे प्रा. नागोराव पांचाळ हे करणार आहेत.
अध्यक्षस्थानी माजी प्राचार्य पुरुषोत्तम निकोडे, प्रमुख अतिथी म्हणून अेबीसी संघर्ष कृती समितीचे जिल्हाध्यक्ष अरूण पा. मुनघाटे, पांडुरंग नागापुरे, दादाजी चापले, प्रभाकर वासेकर, दादाजी चुधरी, पंडीत पुडके, रामदास होकम, पांडुरंग घोटेकर, भाष्कर बुरे, रूचित वांढरे, सुरेश मांडवगडे, सुरेश भांडेकर, गोपीनाथ चांदेवार, करण पेटकूले, पुरुषोत्तम लेनगुरे, पुरुषोत्तम झंझाळ, प्रशांत अलमपटलावार, दामोधर कांबळे, गोवर्धन चव्हाणे, आनंदराव पिपरे, प्रा. सुर्यकांत भोंगळे, मेघराज राऊत, मुखरू मांदाळे, चंदू शिवनकर आदी उपस्थित होते.संचालन व प्रास्ताविक अभियानाचे जिल्हा निमंत्रक तथा राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे उपाध्यक्ष प्रा. शेषराव येलेकर तर आभार प्रा. देवानंद कामडी यांनी मानले.गोंदियात या यात्रेकरीता संतोष खोब्रागडे,कमल हटवार यांच्याकडे जबाबदारी देण्यात आलेली आहे.