ओबीसी सेवा संघाचे मागासवर्ग आयोगाला निवेदन

0
13

भंडारा,दि.13ः- ओबीसी सेवा संघ,ओबीसी महिला संघ व ओबीसी विद्यार्थी संघ जिल्हा भंडारा शाखेच्यावतीने महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाला मराठा समाजाला ओबीसीमध्ये आरक्षण देण्यात येऊ नये यामागणीचे निवेदन सादर करण्यात आले.11 एप्रिल रोजी नागपूर येथील रविभवन येथे मराठा आरक्षण जनसुनवाई व आक्षेप एैकण्याकरीत मागासवर्ग आयोगाची समिती आली होती.त्या समितीकडे ओबीसी समाजामध्ये मराठा समाजाला आरक्षण देण्यात येऊ नये त्याना स्वतंत्र आरक्षण देण्यात यावे अशा प्रकारचे निवेदन देण्यात आले. निवेदन ओबीसी सेवा संघाचे भंडारा जिल्हाध्यक्ष गोपाल सेलोकर,कोषाध्यक्ष रमेश शहारे,मार्गदर्शक केशव हुड, अर्जुन सुर्यवंशी,जिल्हा संघटक गोपाल देशमुख,ओबीसी विद्यार्थी संघ प्रमुख सुधाकर मोथरकर, ओबीसी महिला संघ अध्यक्ष मंजुषा बुरडे, आनंद बांते,श्रीमती धांडे उपस्थित होते.यावेळी ओबीसी सेवा संघ तसेच बावने कुणबी समाज मंडळाचे निवेदन सादर करण्यात आले.