रस्ता बांधकामातील भ्रष्टाचार थांबविण्याची मागणी

0
24

साकोली,दि.13ः-येथील दुर्गा मंदिर चौक ते गडकुंभली सिमेंट रस्ता बांधकामात होत असलेला भ्रष्टाचार थांबवून कंत्राटारावर पोलिस कारवाईकरावी, अशी मागणी नागरिकांनी केली असून याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी व तहसीलदारांना निवेदन देण्यात आले आहे.
दुर्गा मंदिर रोड चौक ते गडकुंभली सिमेंट रस्त्याचे निकृष्ट बांधकाम सुरू असून यात लोहा कमी व लहान आकाराचे वापरून जास्त जागा सोडून बांधण्यात आला आहे, प्रस्तावित मानकानुसार काम न करता कंत्राटदाराच्या मनर्मजीनुसार काम सुरू आहे, निकृष्ट दर्जाचे चेतक नावाचे कमी दर्जाचे सिमेंट वापरण्यात येत असून सिमेंट, रेती व गिट्टीचे प्रमाण बरोबर नाही. जुना रस्ता खोदून इस्टीमेटप्रमाणे गिट्टीचा थर देऊन रस्ता बांधकाम करणे आवश्यक असताना मानकानुसार थर देण्यात आलेला नाही.
जनतेच्या पैशाची नासाडी करून करण्यात येत असून बांधकाम थांबविण्यात यावे तसेच ठेकेदारास काळ्या यादीत टाकून पोलीस कारवाईकरण्यात यावी, अन्यथा नगरपरिषदेसमोर तिव्र आंदोलन करण्याचा इशारा प्रभाग क्र. ४ च्या नागरिकांनी निवेदनातून दिलेला आहे.