ओबीसी प्रवर्गात कोणत्याही जातीचा समावेश करू नका

0
9

गडचिरोली,दि.13ः-राज्य मागासवर्ग आयोगाने रवीभवन नागपूर येथे ११ एप्रिल रोजी मराठा आरक्षणासंदर्भात जनसुनावणी आयोजित केली होती.यावेळी गडचिरोली जिल्ह्यातून राष्ट्रीय ओबीसी महासंघ, ओबीसी संघर्ष कृती समिती, संताजी सोशल मंडळ, विदर्भ प्रांतिक तेली महासभा, माळी समाज संघटना, वैदर्भीय गाडीलोहार व तत्समजाती महासंघ, ऑल इंडिया बंजारा समाज, कुणबी समाज संघटना आदी संघटनांच्या शिष्टमंडळाने मराठा समाजासह पुढारलेल्या कोणत्याही जातीचा ओबीसी प्रवर्गात समावेश करू नये, सरकारला पुढारलेल्या जातींना आरक्षण द्यायचे असेल तर त्यांना ओबीसींच्या २७ टक्के आरक्षणाला धक्का न लावता स्वतंत्र आरक्षण द्यावे, अशी मागणी आयोगाला करण्यात आली.
गडचिरोली जिल्ह्यात २00२ पासून ओबीसींचे आरक्षण १९ टक्क्यांवरून ६ टक्क्यांवर आणले आहे. ९ जून २0१४ च्या राज्यपालांच्या अधिकसुचनेमुळे ते आता जवळपास शून्य टक्के झाले आहे. गडचिरोली जिल्ह्यासह राज्यातील इतर ७ जिल्ह्यात कमी केलेले ओबीसींचे आरक्षण पूर्ववत करावे, अशी विनंती सर्व शिष्टमंडळांनी आयोगाला केली. यावेळी प्रा. शेषराव येलेकर, अरूण मुनघाटे, सुरेश भांडेकर, सुखदेव जेंगळे, सुरेश भांडेकर, सुखदेव जेंगठे, सुरेश मांडवगडे, गोवर्धन चव्हाण, प्रशांत वाघरे यांच्या नेतृत्वात रमेश भुरसे, बाबुराव कोहळे, योगेश सोनुले, दामोधर कांबळे, कृष्णा टिकले, धर्मदास नैताम, भास्कर बुरे, मुकाजी भेंडारे, चरण पेटकुले, मुखरू मांदाळे आदी उपस्थित होते