भंडारा येथे सरकारच्या निषेधार्थ निघाला कॅंडल मार्च

0
7

भंडारा,दि.16ः- देशामध्ये महिलांवर, मुलींवर होणाऱ्या वाढत्या अत्याचाराच्या विरोधात मोदी व फडणवीस सरकार च्या निषेधार्थ, महिला व मुलींना न्याय मिळवून देण्यासाठी दिनांक १५ एप्रिलला सायंकाळी ७.३० वाजता विश्रामगृह ते गांधी चौक ” कॅडल मार्च” काढण्यात आले.बलात्कारातील आरोपीला वाचविण्याचे प्रयत्न काश्मिर व उत्तरप्रदेशातील भाजपसरकार व केंद्र सरकार करीत असल्याची टिका उपस्थितांनी यावेळी केली.8 वर्षीय मुलीवर बलात्कार झाल्यानंतर त्या मुलीच्या कुटुबियांवर चुकीचे आरोप करुन आरोपीला वाचविण्याचे काम काही संघटनानी सुरु केल्याचा निषेधही नोंदविण्यात आला. याप्रसंगी माजी आमदार आनंदराव वंजारी, जिल्हा अध्यक्ष प्रेमसागर गणवीर, जिल्हा परिषद अध्यक्ष रमेश डोंगरे,जिल्हा महासचिव शिशिर वंजारी, तालुका अध्यक्ष राजकपूर राऊत, शहर अध्यक्ष सचिन घनमारे, जिल्हा परिषद सभापती प्रेम वनवे, महिला जिल्हा अध्यक्षा सीमा भुरे, पक्षनेता शमीम शेख, युवक काँग्रेस कार्याध्यक्ष प्रसन्ना चकोले, अल्पसंख्यक विभाग जिल्हा अध्यक्ष अवैश पटेल, अनुसूचित जाति प्रभारी जिल्हाध्यक्ष डॉ. विनोद भोयर, फिशर सचिव प्रकाश पचारे, विकास राऊत, डॉ. अजय तुमसरे, महिला अध्यक्षा भावना शेन्डे,नगरसेविका जयश्री बोरकर, अनुसूचित जाति शहर अध्यक्ष विनीत देशपांडे, अल्पसंख्यक शहर अध्यक्ष रिजवान काजी, युवक काँग्रेस शहर अध्यक्ष कमलेश बाहे, शहर उपाध्यक्ष सुरेश गोन्नाडे, शहर महासचिव इमरान पटेल, प्रवीण भोंदे, पराग खोब्रागडे, शमीम पठाण, भारती लिमजे, इरफान पटेल, पराग सुखदेवे, सुहास गजभिये, अमय डोंगरे, मोहीश कुरैशी, मुशीर पटेल, कमल साठवणे, तसेच शहरातील नागरिक, काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते कॅडल मार्च ला उपस्थित होते.