जलसंकट दूर करणे आमचे प्रथम लक्ष्य-आ.अग्रवाल

0
13

गोंदिया,दि.16 : आज संपूर्ण जगात पाणी टंचाई भासत आहे. मानवी जीवनात पाण्याचे खूप महत्व आहे. पाण्याशिवाय मनुष्य जीवनाची कल्पनाच करता येत नाही. त्यामुळेच गोंदिया विधानसभा क्षेत्रात जलसंकटावर मात करणे, आमचे प्रथम लक्ष्य आहे, असे प्रतिपादन आ. गोपालदास अग्रवाल यांनी केले.
आ. अग्रवाल यांच्या प्रयत्नांनी ८० लाख रूपयांच्या खर्चाचे मंजूर ग्राम हिवरा येथे पेयजल पुरवठा योजनेच्या नवीन जलस्त्रोतांर्गत विहीर व पुरवठा पाईप लाईन बांधकाम, तीन लाखांच्या आमदार निधीतून मंजूर राणी अवंतीबाई स्मारकाजवळ सभामंडप बांधकाम व तीन लाखांच्या निधीतून मंजूर जनसुविधा योजनेंतर्गत स्मशान रस्ता बांधकामाचे भूमिपूजन आ. गोपालदास अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी जि.प. अध्यक्ष सीमा मडावी होते. अतिथी म्हणून जि.प. सभापती रमेश अंबुले, जि.प. सभापती लता दोनोडे, पं.स. सभापती माधुरी हरिणखेडे, पं.स. उपसभापती चमन बिसेन, प्रकाश रहमतकर, कृउबासचे उपसभापती धनलाल ठाकरे, सरपंच सजिव लिल्हारे, उपसरपंच विशाल साखरे, ग्रा.पं. सदस्य फुलचंद बन्नोटे, श्वेता वंजारी, माधुरी धारणे, प्रमिला भास्कर, तरूणा साखरे, सरोज लिल्हारे, कनेरलाल पिसोडे, राजेशसिंग परिहार, पोलीस पाटील विनोद नंदेश्वर, फागुलाल माहुले, सूर्यभान टेंभुरकर, सुखदेव ढोमणे, डॉ.एम.बी. ठाकरे, तेजलाल गहगये, जिवनलाल लिल्हारे, अरविंद धमगाये, रंजित नंदेश्वर, श्यामकुवर अंबादे, आनंद बनोटे, राजेंद्र दरवडे, खिमनलाल माहुले, साहेबलाल पिसोडे, मनोहरलाल पिसोडे, शिवचरण पिसोडे, मनोज शहारे, खुमेश ठाकरे उपस्थित होते