सौन्दड़ येथे बांबू आणि जलाऊ लाकडाच्या डेपोला मंजुरी

0
13

सडक अर्जुनी,दि.18 -जनसेवा बहुउद्देशिय संस्थेच्यावतीने तालुक्यातील सौन्दड़ येथे जलाऊ लाकडे आणि बांबू डेपो सुरु करण्याकरीत देण्यात आलेल्या निवेदनाला उपवनसरंक्षकांनी समंती दिल्याने लवकरच सौंदड येथे बांबू डेपो सुरु होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.जनसेवा संस्थेचे हर्ष मोदी याबद्दल पालकमंत्री राजकुमार बडोले आणि उपवनसरंक्षक एस. यूवराज यांचे आभार मानले आहे.
ग्रामीण भागात अंत्यसंस्कार,लग्न,आदी कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात लाकडांची अावश्यकता असते परिणामी नागरिकांना गर्जेनुसार नार्इलाने जंगल तोंड करावी लागते मात्र काही वेळी अधिकाऱ्यांच्या तावडीत सापडल्यावर दंडात्मक कारवाई सुद्धा केली जाते. करिता नागरिकांच्या समस्या लक्ष्यात घेत निवेदन देण्यात आले होते. तब्बल 10 महिन्याच्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे.तलुक्यातील सर्वात मोठे गाव म्हणुन सौंदड आहे.रेल्वे मार्ग व महामार्गाला जोडुन आहे.१०ते१५ हजार लोकवस्तीचा गाव असल्याने २० ते २५ खेडे गावचे हे केंद्रबिंन्दु असून जलावु लाकंडासाठी जनतेकडुन सर्रासपणे जगंल तोड केली जाते. त्याकरीता, जनसेवा बहुउददेशिय विकास संस्था चे संस्थापक हर्ष विनोदकुमार मोदी यानी गावात बांबू व जलावु लाकडासाठी डेपो सुरु करण्याची मागणी केली होती.