लाखनी येथे रौप्य महोत्सवी कुणबी समाज सामूहिक विवाह सोहळा उत्साहात

0
15

लाखनी : दि.१९ :तालुक्यासह जिल्ह्यात कुणबी समाज संघटनेद्वारे सामूहिक विवाह सोहळ्याची परंपरा २५ वषापूर्वी सुरू केली. त्याचे आपण साक्षीदार आहोत. सामूहिक विवाह सोहळ्यामुळे पैशांचा व वेळेचा अपव्यय टाळता येतो. सामूहिक विवाह सोहळ्याचे महत्व टिकून राहिले पाहिजे, असे आवाहन खासदार प्रफुल्ल पटेल यांनी केले.
स्थानिक श्री संत तुकाराम बहुउद्देशीय सेवाभावी संस्था लाखनी व कुणबी समाज सेवा मंडळ लाखनीच्या वतीने समर्थ नगरच्या मैदानात रोप्य महोत्सवी सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात २३ जोडपी विवाहबद्ध झालीत. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून माजी केंद्रीयमंत्री खा.प्रफुल पटेल, माजी खा. नाना पटोले, आमदार बाळाभाऊ काशिवार, माजी आमदार सेवकभाऊ वाघाये, मधुकर कुकडे, माजी शिक्षण राज्यमंत्री नानाभाऊ पंचबुद्धे, माजी आमदार राजेन्द्र जैन, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे, अर्बन बँकेचे अध्यक्ष महेश जैन, रामलाल चौधरी, वैनगंगा शुगर आणि पॉवरचे उपाध्यक्ष दादासाहेब टिचकुले, नेत्रतज्ञ डॉ दुर्गेश चोले, जि.प.अध्यक्ष राजेश डोंगरे, माजी अध्यक्षा सौ. भाग्यश्री गिल्लोरकर, जि.प. भंडाराचे माजी सभापती  विनायक बूरडे, नरेश डहारे, जि.प.सदस्य आकाश कोरे, होमराज कापगते,नीलकंठ कायते, पोलिस निरीक्षक हेमंत खराबे, दिलीप कातोरे, माजी सभापती  अशोक चोले, कृ.उ.बा.स.लाखनीचे सभापती शिवराम गिरेपुंजे, नगरपंचायत लाखनीचे उपाध्यक्ष  धनुभाऊ व्यास, संयोजक राजेश बांते, विलास वाघाये या मान्यवरांसह समाजाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

सामूहिक विवाह हे खऱ्या अर्थाने चळवळ म्हणून उदयास आले पाहिजेत. कुणबी समाजाने गेली २४ वर्ष अतिशय उत्तम रित्या विवाह सोहळ्याचं आयोजन केलेलं आहे, २५ वर्षे एखादं मोठं कार्य सातत्याने करत राहणे हे कार्य अतिशय गौरवशाली आहे, असं प्रतिपादन नानाभाऊ पटोले यांनी केले.सन्माननीय अतिथिंच्या हस्ते वर वधूंच्या पालकांचे स्वागत करण्यात आलं व मान्यवरांच्या हस्ते नववधूंना संसारोपयोगी साहित्य भेट देण्यात आले. एकूण २३ जोडपी या सोहळ्यात वैदिक पद्धतीने विवाहबद्ध झाले. संस्थेच्या वतीने वर वधूंना विवाह प्रमाणपत्र देण्यात आले. कार्यक्रमाचे संचलन कुणबी समाज युवा समिती लाखनीचे सहसचिव प्रशांत वाघाये यांनी तर प्रास्ताविक मंडळाचे अध्यक्ष जयकृष्ण फेंडरकर आणि आभार प्रदर्शन मंडळाचे उपाध्यक्ष उमराव आठोडे यांनी केले.

कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी कार्यक्रम संयोजक राजेश बांते, विलास पाटील वाघाये, सचिव रामदासजी सार्वे, पदाधिकारी गंगाधरजी लुटे, माधवराव भोयर, मंगेशजी कानतोडे, भोजराम डहाके, मधुजी मोहतुरे, रमेशजी झलके, रमेशजी रोटके, परसरामजी फेंडरकर, अर्चना ढेंगे, अल्का खराबे, युवा समितीचे अध्यक्ष उमेशजी सिंगनजुडे, सचिव बालूभाऊ फसाटे, संजय वनवे, ओमप्रकाश शेंडे, तिलक हलमारे, रशेष फटे, मोहन बोंद्रे, नितेश टिचकुले, कैलास लुटे, मधुकर राघोर्ते, लोमेश सार्वे, मंगेश धांडे, मोहन रेहपाडे, मनोज इश्वरकर, दुर्गेश चोले तसेच महिला समिती अध्यक्ष आशा वनवे, सदस्या हर्षदा कमाने, दुर्गा अतकारी, मीनाक्षी सिनगंजुड़े, उमा टिचकुले, सारिका रेहपाड़े, अश्विनी वाघाये, शैला सार्वे, अलका खटके, वर्षा वैद्य, गीता तितिरमारे, उर्मिला आगाशे, अंजना पिंपळशेंडे, शालु उरकुडे, निना मोहतुरे व अखिल विश्व गायत्री परिवार लाखनी शाखा, बंसी डेयरी लाखनी आणि उपस्थित सर्व समाजबांधवांनी परिश्रम घेतले.