ग्रामपंचायत बुटीबोरीला नगर परिषदेचा दर्जा

0
14

नागपूर,दि.20ः- जिल्ह्यातील बुटीबोरी ग्रामपंचायतीला नगर परिषदेचा दर्जा देण्यात आला असून शासनाने नगरिकांची ही मागणी पूर्ण करीत या ठरावाला मान्यता दिली. यामुळे आता बुटीबोरी शहर व त्याअंतर्गत येत असलेल्या गावांना नगर परिषदेमार्फत नागरी सुविधा पुरविल्या जातील, अशी माहिती पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागरिकांच्या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करीत ही मागणी पूर्ण केली. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि हिंगण्याचे आमदार समीर मेघे यांनी यासाठी प्रयत्न केले. बुटीबोरी ग्रामपंचायतीत बुटीबोरी, रेंगापार, बोरखेडी (फाटक) या गावांचा समावेश होता. ग्रामपंचायत बुटीबोरीचे नगर परिषदेत रुपांतर करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीने मंजुरी दिली होती. बुटीबोरी ग्रामपंचायतीनेही नगर परिषदेचा दर्जा देण्याचा ठराव पारित केला आहे तसेच बुटीबोरी शेजारील कृषीदेव कारखान्याच्या भागाचे मतदान बुटीबोरीत असल्याने तो भागही ग्रामपंचायत बुटीबोरीत समाविष्ट करण्यास हरकत नाही, असा ठरावही ग्रामपंचायतीत पारीत झाला आहे