जिल्हा मध्यवर्ती बँकेचे सर्वाधिक शेतकर्‍यांना कर्ज वाटप

0
43

भंडारा,दि.11-जिल्हा मध्यवर्ती बॅंकेला एकुण ३६८ सेवा सहकारी संस्था संलग्न असून सर्व संस्थांच्या एकुण १,७0४६१ सभासदांपैकी एकट्या जिल्हा बँकेने ९५0८२ सभासदांना कर्जवाटप मागील हंगाम अखेर केल्याची माहिती जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे यांनी दिली.
जिल्हा बँकेमार्फत सर्व सभासदांना संलग्न सेवा सहकारी संस्थांच्या मार्फतीने कर्जपुरवठा करण्यात येत आहे. संस्थेने कर्ज दरखास्त बँकेत सादर केल्यानंतर योग्य छाणनी करून सभासदाचे सी. सी. लिमिट खात्यामध्ये मंजूर रक्कम जमा करण्यात येते. प्रत्येक सभासदाचे खाते शासकीय आदेशानुसार आधार व ए.टी.एम. कार्डशी लिंक करण्यात आले आहेत.
मंजूर रक्कमेपैकी मात्र २ टक्के रक्कम शासकीय निर्देशानुसार सक्तीच्या पिकविमा प्रिमियमसाठी शिल्लक ठेवुन उर्वरीत सर्व रक्कम सभासद ए.टी.एम.कार्डद्वारे केव्हाही काढु शकतात.
यात कोणतीही अडचण नसुन या व्यतीरिक्त कोणतीही कपात करण्यात येत नाही. शेतकर्‍यांना बँकेच्या कर्जवाटप योजनेत कोणताही त्रास नसून कोणतीही जाचक अट नाही. संस्थेचे सभासद व्हा, ७/१२ आणा आणि कर्जवाटप घ्या एवढी सोपी पध्दत या बॅंकेत आहे.
बॅंकेने मागील आमसभेतच सवार्नुमते ठराव मंजूर करून प्रधानमंत्री फसल विमा योजना ही सक्तीची न करता ऐच्छिक करावी अशी विनंती जिल्हाधिकारी यांच्या मार्फत शासनाकडे केली आहे. शासनाकडून अद्याप निर्णय अप्राप्त आहे.
शेतकर्‍यांना मिळालेल्या १ लाखपैकी २ टक्के पिकविमा प्रिमियमची रक्कम बाजुला काढुन उर्वरीत रक्कम प्रत्यक्ष सभासदाच्या सी.सी.लिमिट खात्याला जमा देण्यात येते. जेणेकरून ए.टी.एम. मधुन केव्हाही शेतकरी रक्कम काढु शकला पाहिजे. या शुध्द हेतुने बँकेने ही प्रणाली विकसीत केली आहे. चालु हंगामात १0 मे २0१८ पयर्ंत बँकेने १६ हजार सभासदांना ८0 कोटी रूपयाचे पिककर्ज वाटप केले आहे, असेही सुनील फुंडे यांनी नमूद केले.