ग्रा.पं.पोटनिवडणूकीचा कार्यक्रम जाहीर

0
11

गोंदिया,दि.११ : जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या रिक्त झालेल्या सरपंच व सदस्य पदाच्या जागेसाठी राज्य निवडणूक आयोगाने पोटनिवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार नामनिर्देशनपत्र सादर करणे- १२ मे पर्यंत सकाळी ११ ते दुपारी ४.३० पर्यंत, नामनिर्देशनपत्राची छाननी- १४ मे रोजी सकाळी ११ वाजतापासून छाननी संपेपर्यंत, १६ मे- नामनिर्देशनपत्र मागे घेण्याचा अंतिम दिनांक दुपारी ३ वाजतापर्यंत व निवडणूक चिन्ह नेमून देवून अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराची यादी प्रसिध्द करणे दुपारी ३ वाजतानंतर. २७ मे रोजी मतदान सकाळी ७.३० ते दुपारी ३ वाजतापर्यंत. २८ मे रोजी मतमोजणी आणि २९ मे रोजी निवडणूकांचा निकाल प्रसिध्द करण्यात येईल.
पोटनिवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतीमध्ये गोंदिया तालुक्यातील वळद, कारुटोला, डोंगरगाव. तिरोडा तालुका- नहरटोला. आमगाव तालुका- बासीपार, पाऊलदौना. सालेकसा तालुका- गोऱ्हे. देवरी तालुका- मुरमाडी, चिल्हाटी, पालांदूर/जमी., ककोडी, कोटजंभोरा, कडीकसा, शेरपार, इस्तारी, मिसपीरी, आलेवाडा, नकटी, पळसगाव. गोरेगाव तालुका- खाडीपार, तिल्ली, शहारवानी, मोहगाव/तिल्ली. सडक/अर्जुनी तालुका- पळसगाव, कोयलारी, दल्ली, खोबा, भुसारीटोला, पळसगाव/डव्वा, धानोरी. अर्जुनी/मोरगाव तालुका- गौरनगर, अरुणनगर, दिनकरनगर, जानवा येथील ग्रामपंचायतीच्या २ सरपंच व ४१ सदस्य अशा एकूण ४३ रिक्त पदांसाठी निवडणूक होत आहे.