व्हिव्हिपॅट मशिन बदलविण्याचे काम सुरू-निवडणूक निर्णय अधिकारी

0
14

भंडारा, दि.28: भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीसाठी सोमवारी सुरू झालेल्या मतदान प्रक्रि येत व्हिव्हिपॅट मशिनने खोडा घातला. अनेक ठिकाणी व्हिव्हिपॅट मशिनमध्ये तांत्रिक बिघाड निर्माण झाल्याने मतदानाची प्रक्रि या थांबली. तथापि, ज्या-ज्या ठिकाणी मशिन बंद पडल्या, त्या मशिन बदलविण्याचे काम सुरू असून मतदान सुरळीत होत असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी अभिमन्यू काळे यांनी सांगितले.
आज सकाळपासूनच व्हिव्हिपॅट मशिनमध्ये तांत्रिक बिघाड आल्याने अनेक मतदान केंद्रावरील मतदान ठप्प पडले. मशिन बदलविण्यासाठी बराच वेळ झाल्याने मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरविली. व्हिव्हिपॅट मशिनमध्ये २.२ नामक एरर येत असून अभियंत्यांना पाठवून ते दुरुस्त केले जात आहे. कोणत्याही मतदान केंद्रावरील मतदान प्रक्रि या बंद करण्यात आली नसल्याचे अभिमन्यू काळे यांनी सांगितले. व्हिव्हिपॅट मशिनमध्ये थर्माेसेंसीटीव्हीटी प्रिंटींग पेपर असून अधिक तापमानामुळे त्यात बिघाड येत आहे. मतदान प्रक्रि या सुरळीत सुरू ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू असून रात्री ८ वाजतापर्यंत मतदान घेण्यात येईल, असे काळे म्हणाले. परंतु, या बिघाडामुळे मतदार आल्यापावली परत गेले. त्याचा परिणाम मतदानाच्या टक्केवारीवर होणार आहे.