आदर्श मतदान केंद्रावरील वातावरणाने मतदार भारावले

0
39
नितीन लिल्हारे
मोहाडी,दि.28 : दारासमोर सुस्वागतम असे लिहलेली रांगोळी, केळीचे खुंट, दारावर फुलांची सजावट, फुलांचे व बलूनाचे तोरण, सनईचे सूर, मंद सुगंधाचा दरवळ, फुलांनी होणारे स्वागत, हिरवेगार पताकांनी सजलेले केंद्र आणि पिवळे रंगाच्या एकाच पोशाखातील हसतमुख कर्मचारी एखाद्या लग्न घरात शोभेल अशा वातावरणात आज ताडगावकरांनी मतदान केले. आदर्श मतदान केंद्र साकारताना प्रशासनाने केलेल्या अनोख्या उपक्रमामुळे मतदार अक्षरश: भारावून गेले. जिल्हा परिषद, पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदानाचा टक्का वाढविण्याच्या उद्देशाने
प्रत्येक मतदारसंघात एक आदर्श मतदान केंद्र तयार करून त्याठिकाणी सजावट करून मतदान केंद्रावर आकर्षण निर्माण होईल या दृष्टीने आदर्श मतदार केंद्र उभारण्यात आले.
 त्यामधील ताडगाव मतदान केंद्र ‘हिरवेगार’ रंगाच्या थीमनुसार मतदारांना आकर्षित करुन घेण्यासाठी विशेष रंगसंगतीने सजविण्यात आले होते.
मोहाडीचे निवडणूक अधिकारी तथा तहसिलदार सूर्यकांत पाटील, ग्रामसेवक प्रफुल गिरी, तलाठी धांडे, शासकीय व प्रशाकीय अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम राबविण्यात आला.
या मतदान केंद्रावर सकाळी मतदानासाठी आलेल्या पहिल्या पाच मतदारांचे स्वागत फुले देऊन करण्यात आले. जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळा ताडगाव या मतदान केंद्रावर केंद्राध्यक्षासह सर्व मतदान केंद्र अधिकारी महिला होत्या. मदतनीस शिपाई आणि पोलिस कर्मचारीही महिला होत्या. महिला पोलिस वगळता सर्व कर्मचारी पिवळे रंगाच्या  रंगसंगतीचा पोशाख करून आल्या होत्या. या मतदान केंद्रात हिरवगार पर्यावरणाला सुशोभित सुभेल असे निसर्गमय वातावरण निर्मित केले होते. रंगाचे पताके, फुगे लावण्यात आले होते. त्याच बरोबर या मतदान केंद्राच्या आवारात सीसीटीव्ही कॉमेरे लावून इलेक्टट्रनिकच्या माध्यमातून लाईव्ह प्रशारण करण्यात आले होते. आजची युवा पिढी सेल्फीचा छंदाद मग्न असल्याने ”मी मतदार” सेल्फी कॉर्नर असे पोस्टर लावण्यात आले होते. या मतदान केंद्रावर विद्युत व्यवस्था, कचराकुंडी, अग्नीशमन यंत्रणा, थंड पिण्याचे पाणी, स्वतंत्र पुरुष-स्त्री प्रसाधनगृह, अपंग यांना व्हील चेहर, वृध्द मतदारास, गरोदर महिला, विधवा, व अपंग  मतदारांना सावलीत बसण्याची पुरेपूर व्यवस्था करण्यात आली.
मतदान केंद्रावर आल्यानंतर मतदारांना प्रसन्न वाटावे, आनंद वाटावा त्यांचे कर्मचाऱ्याकडून स्वागत व्हावे, असे या आदर्श  केंद्रावर अपेक्षित होते, पुढच्या निवडणुकांमध्ये प्रत्येक मतदान केंद्र अशा प्रकारे सजवले जावे,असे अपक्षीत आहे.
 या मतदान केंद्राबाहेर 100 व 200 मीटर हद्दीची निशाणी चुना टाकून दर्शवलेली होती,  त्याचप्रमाणे मतदान केंद्राबाहेर मतदान केंद्राचा तपशील, इशारा, मतदार यादी, नमुना पत्रिका व सूचना इ. मतदाराला दिसतील अशा दर्शनी भागात लावण्यात आले, मतदान केंद्राचे बाहेर पुरुष व स्त्री मतदारांच्या स्वतंत्र रांगा लावण्यासाठी पुरेशी जागा उपलब्द करून देण्यात आली होती. या मतदान केंद्राला निवडणूक अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी स्मिता पाटील, तहसिलदार सूर्यकांत पाटील यांनी भेट देऊन केंद्राची पाहणी केली यावेळी अधिकाऱ्याचे कौतुक करण्यात आले यावेळी उपस्थित ग्रामसेवक गिरी, तलाठी धांडे, नितीन लिल्हारे, रमेश लेडे, माणिक सिंगाडे, लक्ष्मण राऊत, राजेश उईके, सूरज वणवे, महसूल, ग्रामपंचायत, प्राथमिक शाळा समितीचे अधिकारी प्रशासकीय व मतदार होते. आदर्श मतदार केंद्राविषयी तहसीलदार यांच्याशी बोलले असता आदर्श गाव जसे असते त्याप्रमाणे हे आदर्श मतदान केंद्र प्रत्येक मतदारसंघात एक बनविण्यात आले आहेत, असे मोहाडीचे तहसिलदार सूर्यकांत पाटील यांनी माहिती दिली.