‘अंनिस’ने केला भोंदुबाबाचा पर्दाफाश

0
10

अकोला ,दि.२८: स्त्री-पुरूषांमधील दोष दूर करून देतो, अशी स्थानिक वृत्तपत्रांमध्ये जाहीरात देऊन त्याद्वारे पूजा करण्यासाठी संबंधित नागरिकांकडून पैसे मागणाऱ्या भोंदुबाबाला येथील एका खासगी हॉटेलमधून अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सजकतेने सिव्हिल लाइन पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने त्याची कारागृहात रवानगी केली.

काय म्हणतो कायदा?
आजारांवर इलाज करण्याचा दावा करणे, जाहिरात करणे किंवा त्याचा प्रचार प्रसार करणे हाच जादूटोणा विरोधी कायद्यानुसार गुन्हा ठरतो.  हा भोंदू ज्योतिषी मागील अनेक वर्षांपासून अकोलेकरांची फसवणूक करत होता.

अंनिसच्या कार्यकर्त्यांमुळे फसवणूक थांबली
अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे ज्येष्ठ कार्यकर्ते शरद वानखडे यांचे मार्गदर्शनात महानगर संघटक चंद्रकांत झटाले, युवा संघटक अॅड. अनिल लव्हाळे, अॅड. शेषराव गव्हाळे, हरीश आवारे, महिला संघटीका संध्याताई देशमुख यांनी त्या भोंदू ज्योतिषाची पोलिसात तक्रार दिल्याने अकोलेकरांची होणारी फसवणूक थांबली.