गोळवलकरांच्या नव्हे तर फुले आंबेडकरांच्या विचाराने चालणार देश-मेवानी

0
15

नागपूर,दि.29 : स्वतःला चौकीदार म्हणणाèया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विजय माल्या आणि नीरव मोदी यांना भारताबाहेर जाताना का नाही अडवले. मोदी तुम्ही चौकीदार नाही चोर आहात, अशी जोरदार टीका गुजरातचे आमदार जिग्नेश मेवानी यांनी केली.ते नागपुर येथे रिपब्लिकन युथ फेडरेशन व रिपब्लिकन स्टुडंन फेडरेशनतर्फे आयोजित मानवाधिकार परिषदेत बोलत होते. मोदी यांच्या काळात ९० हजार कोटी रुपयांचे घोटाळे झाले. मोदी तुम्हाला सोडणार नाही, तुम्ही गुजराती तर मी पण गुजराती आहे.हा देश गोळवलकरांच्या विचारावर नाही तर फुले, आंबेडकर आणि भगत सिंग यांच्या विचाराने चालणारा आहे,असे मेवानी यांनी म्हटले आहे.
राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे अध्यक्षस्थानी होते.कार्यक्रमाला रिपब्लिकन विचारवंत रमेश जीवने, आयटकचे नेते श्याम काळे, भगतसिंह विचार मंचचे गुरप्रितसिंह,राष्ट्रीय दलित अधिकार मंचचे विदर्भ संयोजक नीलेश देशभ्रतार, दलित मुस्लिम एकता मंचचे नेते अफझल फारुख प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
जिग्नेश मेवानी म्हणाले, की देशात महिला, मुली आणि बहिणी सुरक्षित नाही, तर गायी सुरक्षित आहेत. भाजपचे लोक पुन्हा सत्तेत आले तर ते देशाचा हाल करतील, व्यक्ती स्वातत्र्यांवर निर्बंध घालतील. पंतप्रधान मोदी यांना संविधान नष्ट करून मनुस्मृती आणायची आहे, ते सुरक्षा रक्षक नाही, चोर आहेत. ज्या लोकांच्या खात्यात २०१९ पूर्वी १५ लाख रुपये जमा झाले नाही त्यांनी मोदी यांच्या विरोधात ४२० चा गुन्हा दाखल करावा. गौरी लंकेश यांच्या हत्येनंतर काही संघी लोक त्यांना ट्विटरवर शिव्या घालत होते आणि मोदी त्यांना फॉलो करत होते. मोदी यांना फ्रॉड ऑफ दी सेंच्युरी पुरस्कार मिळायला हवा. जर भाजप एक हिंदू विरोधी पक्ष नाही, तर संघ आणि अभाविपच्या लोकांना तरी रोजगार द्या असेही मेवानी म्हणाले.आयोजनासाठी फेडरेशनचे राहुल जारोंडे, क्षितिज गायकवाड, अमिल भालेराव, नितेश मेश्राम, प्रतिक डोर्लीकर, राजस खोब्रागडे, आशिष मेश्राम, कबीर मेश्राम, संकेत अलोणे, निखिल डोंगरे यांनी सहकार्य केले आहे.