३० मे रोजी ४९ मतदान केंद्रावर फेरमतदान ; मतदान सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत

0
4

ङ्घ फेरमतदान क्षेत्रात शासकीय सुट्टी
ङ्घ ३० मे रोजी कोरडा दिवस
ङ्घ अर्जुनी/मोरगाव क्षेत्रात सकाळी ७ ते दुपारी ३ पर्यंत मतदान
गोंदिया, दि.२९ : भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघ पोटनिवडणूक २०१८ साठी खालील नमुद मतदान केंद्रावर फेरमतदान बुधवार, ३० मे २०१८ रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत घेण्यात येणार आहे. फेरमतदान असणाऱ्या क्षेत्रात मतदान करण्यासाठी शासकीय सुट्टी जाहिर करण्यात आली आहे. त्याच प्रमाणे ३० मे रोजी कोरडा दिवस लागू करण्यात आला आहे.
६१-भंडारा विधानसभा- ३०२- अडयाळ, ३२०नवेगाव, ३१८-उमरी, ३३५-पिंपळगाव, ४०३-पवनी, ४०५-पवनी, ३७४-खैरी दिवाण, ३१४-पिलांद्री, ३१७-केसलवाडा,३२२-पाथरी पुर्नवसन, ३६२-लोणारा, ३६३-लोणारा, ४२८-वलनी, ४२९-वलनी एकूण १४ केंद्र.
६२- साकोली विधानसभा-३०६-पारडी, ३१६-मुरमाडी, २९२-तई बु., २८७- घोडेझरी एकूण ४ केंद्र. ६३-अर्जुनी मोर विधानसभा-१०८-बोथली, १५९-मानेरी एकूण २ केंद्र. ६४-तिरोडा विधानसभा- ४५-अत्री, ९७-दवनीवाडा, १०२-पिपरटोला, १०८-विहीरगाव, २०५- भजेपार, २१५-पिंडकेपार, ३८-मुरदाळा, ५२-पालडोंगरी एकूण ८ केंद्र. ६५-गोंदिया विधानसभा- ५०-सोनपूरी, ७८-चारगाव, ९४-रतनारा, ११५-कामठा, ११६-कामठा, ११७-कामठा, १२३-लांबटोला, १६९-गोंदिया, १७६अ-गोंदिया, १९४-गोंदिया, २००-गोंदिया, २०६-गोंदिया, २१८-गोंदिया, २२५-गोंदिया, २३३-गोंदिया,२४०-गोंदिया, २५०-गोंदिया, २५३-गोंदिया, २७१-गोंदिया, २७६-गोंदिया, ३०३ अ- फुलचुर एकूण २१ केंद्र असे एकूण ४९ मतदान केंद्रावर फेरमतदान होणार आहे. अर्जुनी/मोरगाव विधानसभा क्षेत्रातील मतदान केंद्रावर सकाळी ७ ते दुपारी ३ वाजतापर्यंत मतदान होणार आहे.