महिन्याच पहिल्याच दिवशी एसडीओ तिरोडाने दिली कार्यालयाला सुट्टी

0
10

गोंदिया,दि.01–तिरोडा येथील उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी कार्यालयात आपली कामे करण्याकरिता आलेल्या अनेक नागरिकांना आज (दि.१) महिन्याच्या पहिल्याच दिवशी मात्र कार्यालय न उघडल्याने आल्यापावल्याच परत जाण्याची वेळ आली.कुठलीही शासकीय सुट्टी नसताना आणि काहीही कार्यक्रम नसताना कार्यालयच जणू न उघडणे हा त्या कार्यालय प्रमुखाच्या कर्तव्यदक्षतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा ठरला आहे.विशेष म्हणजे तिरोडा येथील उपविभागीय अधिकारी यांचे कार्यालय बंद असल्याची माहिती सायंकाळपर्यंत गोंदियाचे निवासी उपजिल्हाधिकारी यांनाही माहित नव्हते.जेव्हा याप्रकरणाची माहिती जाणून घेण्यासाठी त्यांना भ्रमणध्वनीवर संपर्क करण्यात आला,तेव्हा त्यांनी माहिती घेऊन सांगतो मला माहिती नाही असे सांगितले.यावरुन जिल्ह्यातील प्रशासन कुठे चालले आहे अशी म्हणण्याची वेळ जनतेवर आली आहे. तर कामानिमित्त आलेल्या नागरिकांनी मात्र चांगलाच रोष सरकारी यंत्रणेवर काढला.
भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुक असल्याने  निवडणुकीच्या कामाची व्यस्थता सांगत या कार्यालयातील कर्मचार्यानी कामाकरिता येणाऱ्या नागरिकांना आल्यापावल्या परत पाठविण्याचे काम गेली दहा ते 15 दिवस सातत्याने केले.आता तुमचे काम होणार नाही आम्ही निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्याने निवडणूक नंतरच तुमचे काम पाहू असे सांगायला सुध्दा अधिकारी व कर्मचारी विसरले नव्हते असे या ठिकाणी आलेल्या नागरिकांचे म्हणने होते.निवडणुकीचा निकाल लागला आता तरी आपले काम होईल या आशेने आज तिरोडा व गोरेगाव तालुक्यातील काही नागरिक आपले काम करण्यासाठी कार्यालयात पोचले असता कार्यलयाचे कुलुपही बंद होते.थोड्यावेळात सुरु होईल या आशेने रखरखत्या उन्हात कार्यालय उघडण्याची वाट  बघणारे नागरिक मात्र दिड दोन तासानंतर आल्यापावल्या परत गेले,जातांना मात्र येथील बेजाबदार उपविभागीय अधिकारी व त्या कार्यालयातील कर्मचार्यांच्यावर जिल्हाधिकारी यांनी ईमानेइतबारे  कारवाई करावी अशी मागणी  केली.