28.2 C
Gondiā
Wednesday, August 12, 2026
Home विदर्भ चारचाकी वाहनाचा अपघात, एक ठार तर सात जखमी

चारचाकी वाहनाचा अपघात, एक ठार तर सात जखमी

0
36

चंद्रपूर,दि.09 : घुग्घुसकडे जाणाऱ्या चारचाकी वाहन स्काॅर्पिओचा टायर फुटल्याने एक महिला जागीच ठार होऊन तर सात जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. सदर घटना ८ जून रोजी घडली असून इंदुबाई तुळशिराम जोगी वय ६० राहणार शेनगाव असे मृतक महिलेचे नाव आहे. जखमीमध्ये रामचंद्र तुळशिराम जोगी वय ३५, कौस्तुभ रामचंद्र पिंपळशेंडे वय ५ घुग्घुस येथील रहिवासी आहेत  किशोर रमेश बोडे रा.घुग्घुस, चंद्रकला रामचंद्र रोगे रा.घुग्घुस, समीक्षा पांडुरंग भोंगळे घुग्घुस, प्रमीला पांडुरंग भोंगळे, वसुधा पांडुरंग भोंगळे रा. घुग्घुस हे जखमी झाले आहेत. प्राप्त माहितीनुसार एमएच ३४ एए ८७११ क्रमांकाचे स्काॅर्पिओ वाहन नागपूर – चंद्रपूर मार्गे घुग्घुसकडे जात होते. या वाहनाचा टायर फुटल्याने वाहन पलटले. याममध्ये इंदुबाई जोगी जागीच ठार झाली. जखमींना वरोरा येथील उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले असून प्रकृती चिंताजनक असल्याने चंद्रपूर येथील जिल्हा सामान्य रूग्णालयात हलविण्यात आले.